शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Ahmedabad Plane Crash: पायलटने 'मेडे' कॉल दिल्यानंतर काही सेकंदातच कोसळले विमान; 'मेडे' म्हणजे काय?

By शुभांगी काळमेघ | Updated: June 12, 2025 20:31 IST

Nagpur : अहमदाबाद विमान अपघातात वापरलेला शेवटचा इमर्जन्सी कॉल

नागपूर : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच 'मेडे' कॉल दिला आणि त्यानंतर विमान मेघाणी नगर परिसरात कोसळले. या अपघातात २४२ पैकी २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विमानाने उडान भारताचं काही सेकंदातच ते विमान कोसळले, पण त्यापूर्वी पायलटने 'मेडे.. मेडे..' असा संदेश दिल्याचे आता स्पष्ट होत आहे. पण 'मेडे'चा नेमका काय अर्थ होतो आणि तो इमर्जन्सी कॉल केव्हा केला जातो? 

'मेडे' कॉल म्हणजे काय?'मेडे' हा आंतरराष्ट्रीय विमान चालनात वापरला जाणारा एक अत्यंत गंभीर आपत्कालीन संकेत आहे. हा शब्द १९२० च्या दशकात लंडनच्या क्रॉयडन विमानतळावरील रेडिओ अधिकारी फ्रेडरिक स्टॅनली मॉकफोर्ड यांनी तयार केला होता. हा शब्द 'माय डे' (May Day) च्या उच्चाराप्रमाणे आहे, जो फ्रेंच भाषेतील 'm'aider' (मदत करा) या शब्दापासून आलेला आहे.

मेडे कॉल हा एक आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त आपत्कालीन इशारा आहे. विमानातील पायलट किंवा प्रवासी जेव्हा मोठ्या संकटात असतात, जसं की गंभीर यांत्रिक बिघाड, अपघात किंवा प्रवाशांच्या जीवाला धोका असतो तेव्हा तात्काळ मदतीसाठी हा संदेश पाठवतात. १९२३ पर्यंत हा संदेश विमान आणि जहाजांमध्ये वापरण्यात येऊ लागला आणि १९२७ मध्ये मोर्स कोडमधील "SOS" सोबत याला अधिकृत मान्यता मिळाली.

पायलटने 'मेडे' कॉल दिल्यानंतर, विमानतळाच्या नियंत्रण कक्षाने तत्काळ आपत्कालीन प्रतिसाद सुरू केला. मात्र, विमानाचे नियंत्रण गमावल्यामुळे ते मेघाणी नगर परिसरात एका इमारतीवर कोसळले. या अपघातात विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादnagpurनागपूर