बेसूर येथे कृषी प्रशिक्षण, तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST2021-02-15T04:09:01+5:302021-02-15T04:09:01+5:30

बेसूर : तालुका कृषी अधिकारी कार्यालय व राेटरी क्लबच्यावतीने महालगाव (ता. भिवापूर) येथे कृषी प्रशिक्षण व तपासणी शिबिराचे रविवारी ...

Agricultural training, inspection camp at Besur | बेसूर येथे कृषी प्रशिक्षण, तपासणी शिबिर

बेसूर येथे कृषी प्रशिक्षण, तपासणी शिबिर

बेसूर : तालुका कृषी अधिकारी कार्यालय व राेटरी क्लबच्यावतीने महालगाव (ता. भिवापूर) येथे कृषी प्रशिक्षण व तपासणी शिबिराचे रविवारी (दि. १४) आयाेजन करण्यात आले हाेते. यात शेतकऱ्यांना विविध पिकांची लागवड, त्यावरील किडींचे व्यवस्थापन व इतर बाबींची माहिती देण्यात आली.

तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल राऊत हाेते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी पी. एन. डाखळे, राेटरी क्लबचे अध्यक्ष अंबरीश आकरे, तालुका कृषी अधिकारी राजेश जाराेंडे, सरपंच प्रशांत राऊत, रवींद्र राऊत, डॉ. मनोज फलक उपस्थित हाेते. यावेळी शेतकऱ्यांना २०२१ च्या खरीप हंगामातील पिकांचे नियाेजन, साेयाबीनची पेरणी, मिरचीची लागवड, उन्हाळी भाजीपाल्याची पिके, कपाशीवरील गुलाबी बाेंडअळीचे व्यवस्थापन याबाबत तसेच शासनाच्या विविध याेजना, शेतीला पूरक व्यवसाय याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या आराेग्याची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन माजी विभागीय कृषी सहसंचालक डॉ. एस. एस. येवले यांनी केले, तर सतीश दंदे यांनी आभार मानले. शिबिराला स्थानिक व परिसरातील गावांमधील शेतकरी उपस्थित हाेते.

Web Title: Agricultural training, inspection camp at Besur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.