कृषी संशोधन परिषदेची क्रीडा स्पर्धा

By Admin | Updated: September 17, 2014 00:55 IST2014-09-17T00:55:54+5:302014-09-17T00:55:54+5:30

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) मध्य विभागीय क्रीडा स्पर्धेला मंगळवारी रातुम नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर शानदार सुरुवात झाली. पाच दिवसांच्या या स्पर्धेत देशभरातील

Agricultural Research Council sports competition | कृषी संशोधन परिषदेची क्रीडा स्पर्धा

कृषी संशोधन परिषदेची क्रीडा स्पर्धा

नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) मध्य विभागीय क्रीडा स्पर्धेला मंगळवारी रातुम नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर शानदार सुरुवात झाली. पाच दिवसांच्या या स्पर्धेत देशभरातील १९ संघांमधील ६०० वर खेळाडू सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन व्हीएनआयटीचे संचालक डॉ. एन. एस. चौधरी यांच्या हस्ते झाले. एनबीएसएस अ‍ॅन्ड एलयूपीचे संचालक डॉ. एस. के. सिंग हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सीआयसीआरचे संचालक डॉ. के. आर. क्रांती, एनआरसीसीचे संचालक डॉ. एम, एस. लाडानिया आणि रायपूरच्या एनआयबीएसएमचे विशेषाधिकारी डॉ. टी. पी. राजेंद्रन यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सिंग यांनी सर्व अतिथींचे स्वागत केले. अजय मेश्राम यांनी क्रीडाज्योत क्रीडांगणावर आणल्यानंतर डॉ. के. कार्तिकेयन यांनी खेळाडूंना शपथ दिली.
डॉ. एस, चॅटर्जी यांनी संचालन केले. आयोजन समितीचे सचिव डॉ. संजय रॉय यांनी आभार मानले. पुरुष आणि महिलांसाठी अ‍ॅथ्लेटिक्समधील सर्व मैदानी प्रकारांसह सायकल रेस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, शूटिंगबॉल, कबड्डी आणि फुटबॉल आदी खेळांचे आयोजन करण्यात येत आहे.
पहिल्या दिवशी झालेल्या स्पर्धांचे निकाल : १०० मीटर दौड : विनोद कुमार, रोहित कुमार (आयएआरआय दिल्ली), गोळाफेक : अमित राय (एनबीएआयएम), महुनाथ भजन (उत्तर प्रदेश), गुरुदास शाह (आयएआरआय), भालाफेक : ब्रिजमोहन पाल आयएआरआय, कांचन सिन्हा आयएएसआरआय. उंच उडी : विक्रमसिंग संखला एनबीएसएस, अभिषेक राय डीएसआर.
महिला १०० मीटर दौड : पूजा राय डीएफआर पुणे, आशा गौर आयएआरआय, गोळाफेक : मीनल राठोड जबलपूर, चंद्रकला भोपाळ. भालाफेक : सुनीता चौहान नागपूर, मंजू लोहानी भोपाळ. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Agricultural Research Council sports competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.