शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

कृषी अवजारे घोटाळ्याची पुन्हा सखोल चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:11 IST

Nagpur : जिल्हाधिकाऱ्यांनी केली समिती गठित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजकल्याण विभागामार्फत महिला बचत गटांना पुरविण्यात आलेल्या कृषी अवजारांमध्ये घोटाळा झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले होते. आता या प्रकरणाची नव्याने सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दोन समिती गठित केली आहे. पीएमओ कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेत यासंदर्भातील अहवाल मागितल्याने चौकशी समिती गठित करण्यात आली.

समाजकल्याण विभागामार्फत २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील १०० महिला बचत गटांना कृषी अवजारे देण्याची योजना आखली. यासाठी खनिज प्रतिष्ठानमधून ८ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला होता. प्रत्येक महिला बचत गटाला ८ लाख ७१ हजारांचे साहित्य देण्यात येणार होते. परंतु उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना साहित्य मिळालेच नाही. पुरवठादाराने साहित्यच दिले नाही. हे साहित्य ९० टक्के अनुदानावर देण्यात आले. १० टक्के रक्कम भरल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात टाकण्यात आली. समाज कल्याण विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात आल्यानंतर ती लगेच काढण्यात आल्याची माहिती समोर आली. पुरवठादाराकडून काही साहित्य बचत गटांना देण्यात आले. परंतु ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत परत नेले. १० टक्के रक्कम त्रयस्थ व्यक्तीकडून भरण्यात आल्याची बाबही तपासात समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार खनिकर्म विभागाकडून संबंधित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. परंतु कुठलीच कारवाई झाली नव्हती. या प्रकरणातील दोषींना पाठिशी विभाग घालत असल्याची चर्चा रंगली होती. आता या प्रकरणी नव्याने सखोल चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती गठित करण्यात आल्याचे समजते.

पीएमओकडून दखल, विधिमंडळात प्रश्नया विषयासंदर्भात खासदार श्यामकुमार बर्वे यांनी तक्रार केल्याने थेट पीएमओ कार्यालयाकडून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. त्याच प्रमाणे आमदार विकास ठाकरे यांनीही विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला होता. 

टॅग्स :nagpurनागपूरAgriculture Sectorशेती क्षेत्रfraudधोकेबाजी