कृषी विभागाने दडविले १५ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:01 IST2017-10-10T01:00:46+5:302017-10-10T01:01:15+5:30
कीटकनाशक फवारणीमुळे आणि कीटकनाशक प्राशनामुळे नागपूर शहर-जिल्ह्यात १५ शेतकºयांचा मृत्यू झाला.

कृषी विभागाने दडविले १५ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कीटकनाशक फवारणीमुळे आणि कीटकनाशक प्राशनामुळे नागपूर शहर-जिल्ह्यात १५ शेतकºयांचा मृत्यू झाला. परंतु या मृत्यूची माहिती कृषी अधिकाºयांनी दडवून ठेवली. लोकप्रतिनिधीला साधी माहिती देण्याचे सौजन्य अधिकाºयांनी दाखविले नाही. त्यामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रविभवन येथे तातडीची बैठक बोलावून अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात सोमवारी रविभवनात बैठक बोलावली होती. या बैठकीला आ. मल्लिकार्जुन रेड्डी आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे ५ आणि कीटकनाशक प्राशनाने १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कृषी अधीक्षकांनी या बैठकीत दिली. १८ जुलैला पहिला मृत्यू झाला असताना आजतागायत या मृत्यूची माहिती कृषी, महसूल आणि पोलीस विभागाला, पालकमंत्र्यांना द्यावीशी वाटली नाही. पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली म्हणून त्यांना या अक्षम्य प्रकाराची माहिती मिळाली.
महसूल, कृषी आणि पोलीस या तीनही विभागांचा एकमेकात समन्वय नसल्याचे दिसले. या घटना टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकºयांना आणि शेतमजुरांना मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. कृषी विभाग म्हणतो १५ जणांचा मृत्यू झाला तर पोलीस म्हणतात ९ जणांची नोंद आमच्याकडे आहे.
एकूणच तीनही विभागांमध्ये कोणताच समन्वय नसल्याचे सिद्ध झाले. कृषी अधीक्षकासोबत महसूल विभागाचा एकही उपविभागीय अधिकारी मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वना करण्यास गेला नसल्याचेही आढळले. प्रशासनच या घटनांपासून अंधारात राहाते. कृषी विभागाच्या अत्यंत ढिम्म, ढिसाळ, उदासीन आणि संवेदनाशून्य कारभाराचा हा नमुना आजच्या बैठकीत पाहायला मिळाला. लोकप्रतिनिधींना माहिती न दिल्यामुळे ते मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यास जाऊ शकले नाहीत आणि शासनाबद्दल गैरसमज पसरण्यास मदत झाली.
पिकांवर फवारणी करताना विषबाधेने मृत झालेल्यांमध्ये कळमेश्वर येथील माणिक शेंडे, भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथील प्रभाकर मिसाळ, कामठी तालुक्यातील उनगाव येथील मुरलीधर खडसे, मौदा तालुक्यातील पावडदौना येथील संभाजी वांगे, खात येथील दिनेश ढोलवार यांचा समावेश आहे.
कृषी अधिकारीच अनभिज्ञ
कीटकनाशकाच्या फवारणीमुळे मृत झालेल्या व्यक्तींबद्दल कृषी अधिकारी आणि कृषी सहायकांनाही माहिती नसल्याची बाब या बैठकीत निदर्शनास आली. एकही कृषी सहायक आणि कृषी अधिकारी मुख्यालयी राहात नसल्यामुळे आणि शेतकºयांच्या संपर्कात राहात नसल्यामुळे त्यांना ही माहिती मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले.
मुख्यालयी राहून मदत करा
यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी कृषी अधिकाºयांना मृत शेतकºयांच्या घरी भेटी देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करा, मुख्यालयी राहून शेतकºयांना योग्य ती मदत तात्काळ करा, असे निर्देश दिले.