शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

संस्कृत विद्यापीठाचा कर्नाटक संस्कृत विद्यापीठासोबत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:43 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे बंगळुरु येथील कर्नाटक संस्कृत विद्यापीठासमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या अनुषंगाने विविध शैक्षणिक, संशोधन आणि वैज्ञानिक स्तरावरील विविध अभ्यासक्रम, परिषदा, सेमिनार, कार्यशाळा, उन्हाळी प्रशिक्षण वर्ग, परिसंवाद आणि मान्यवर तज्ज्ञांची व्याख्याने यासारखे उपक्रम परस्पर सहकार्याने राबविण्यात येतील. याशिवाय दोन्ही विद्यापीठादरम्यान प्रत्येक ...

ठळक मुद्देविविध शैक्षणिक साहित्य आणि प्रकाशनांचे होणार आदानप्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे बंगळुरु येथील कर्नाटक संस्कृत विद्यापीठासमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या अनुषंगाने विविध शैक्षणिक, संशोधन आणि वैज्ञानिक स्तरावरील विविध अभ्यासक्रम, परिषदा, सेमिनार, कार्यशाळा, उन्हाळी प्रशिक्षण वर्ग, परिसंवाद आणि मान्यवर तज्ज्ञांची व्याख्याने यासारखे उपक्रम परस्पर सहकार्याने राबविण्यात येतील. याशिवाय दोन्ही विद्यापीठादरम्यान प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक विद्यार्थी यासंदर्भात आदानप्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय दोन्ही विद्यापीठाना आवश्यक अशा विविध शैक्षणिक साहित्य आणि प्रकाशनांचे आदानप्रदान करण्यात येईल२७ मार्च रोजी या सामंजस्य करारावर कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद जोशी आणि कर्नाटक संस्कृत विद्यापीठाच्या कुलसचिव शिल्पा के.ए.एस. यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी, विद्यापीठ नियोजन मंडळाचे संचालक डॉ. सी.जी. विजयकुमार, कर्नाटक संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. एम. जी. वेंकटेशम, विद्यापीठ नियोजन विकास मंडळाचे संचालक डॉ. सी. जी. विजयकुमार, कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. व्ही. शिवानी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पाली भाषा विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर प्रामुख्याने उपस्थित होते. या करारांतर्गत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य, संशोधन प्रकल्प आणि प्रकाशन विभागाचे संचालक व अधिष्ठाता डॉ. मधुसूदन पेन्ना तर कर्नाटक संस्कृत विद्यापीठातर्फे वेदांत शाखेचे अधिष्ठाता डॉ. वीरनारायण एन. के. पांडुरंगी आणि शास्त्र शाखेच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. व्ही. शिवानी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करणार आहेत.

टॅग्स :universityविद्यापीठKavi Kulguru Kalidas Sanskrit Universityकवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ