शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही : दीपक कुळकर्णी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:33 IST

तुम्हाला शिकण्याची आवड असेल तर वय महत्त्वाचे ठरत नाही. शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते, तुम्ही कोणत्याही वयात शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण करू शकता, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक कुळकर्णी यांनी केले.

ठळक मुद्देलोकमत प्रिंटींग प्लँट, बुटीबोरी येथे दोन दिवसीय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रोग्राम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुम्हाला शिकण्याची आवड असेल तर वय महत्त्वाचे ठरत नाही. शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते, तुम्ही कोणत्याही वयात शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण करू शकता, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक कुळकर्णी यांनी केले.लोकमत मीडिया प्रायवेट लिमिटेड आणि  महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन, नागपूर विभागीय केंद्र यांच्यावतीने लोकमत प्रिन्टींग प्लँट, बुटीबोरी येथे दोन दिवसीय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. प्रोग्रामच्या उद््घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुळकर्णी बोलत होते. ते पुढे म्हणाले, शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि समर्पणाची आवश्यकता आहे.लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला मालार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कॉर्पोरेट सोशल रिस्पान्सब्लिटी (सीएसआर) अंतर्गत आयोजित दोन दिवसीय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रोग्राम पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल, प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंटिंग अ‍ॅन्ड पॅकेजिंग इंजिनियरिंग आदी विभागांसाठी आहे. यामध्ये  महाराष्ट्रातील विविध शहराचे २९ फॅकल्टी सहभागी झाले आहेत. लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सिनियर जनरल मैनेजर (प्रोडक्शन), नागपूर डॉ. राजेंद्र पिल्लेवार यांनी ट्रेनिंग प्रोग्रामच्या पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, १९ वे शतक उद्योगांचे, २० वे शतक माहिती व तंत्रज्ञानाचे तर २१ वे शतक हे इंडस्ट्री आणि अकॅडमिक्सला कनेक्ट करणारे आहे. इंडस्ट्री आणि अकॅडमिक्स यांना एक दुसऱ्यांकडून अनेक अपेक्षा आहेत. दोन क्षेत्रांना कनेक्ट केल्यास अनेक समस्या सहज सुटू शकतील. कार्यक्रमादरम्यान लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे गजानन शेंडे (सिनियर मॅनेजर प्रोडक्शन), आनंद नानकर (मॅनेजर मेकॅनिकल), नरेश राऊत (मॅनेजर इलेक्ट्रिकल) प्रामुख्याने उपस्थित होते. आर.आर. तायडे या कार्यक्रमाच्या समन्वयक होत्या. कार्यक्रमाचे संचालन एचआर एक्झिक्यूटिव्ह सुनील कोंगे यांनी केले.

टॅग्स :Lokmatलोकमतnagpurनागपूर