शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव हिंसाचारविरोधात उपराजधानीत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 19:46 IST

भीमा कोरेगाव हिंसाचाराविरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला उपराजधानीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुरळक घटना वगळता शहरात शांततामय पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवली होती हे विशेष. दरम्यान, दिवसभर शहरातील प्रत्येक भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसून आला व कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

ठळक मुद्देतुरळक अपवाद वगळता शांततामय निषेध : कडेकोट सुरक्षा बंदोबस्तगंगाबाई घाट परिसरात बसवर दगडफेकशताब्दी चौक, इंदोरा चौकात तणावचौकाचौकात पोलीस

आॅनलाईन लोकमतनागपूर : भीमा कोरेगाव हिंसाचाराविरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला उपराजधानीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुरळक घटना वगळता शहरात शांततामय पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवली होती हे विशेष. दरम्यान, दिवसभर शहरातील प्रत्येक भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसून आला व कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.भीमसैनिकांवर दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करीत शहरातील विविध भागात दलित संघटनांचे कार्यकर्ते निदर्शने करीत होते. वाडी, इंदोरा, शताब्दी चौक, भीमचौक, मानेवाडा चौक, इमामवाडा, जयताळा भागात प्रचंड संख्येत जमावाने घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदविला. काही ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळण्यात आले तर गंगाबाई घाट परिसरात एका बसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेसोबतच शहरात दोन ते तीन ठिकाणी तुरळक दगडफेकीचे प्रकार झाले. मात्र हे अपवाद वगळता शहरात शांतता दिसून आली. दुपारनंतर संविधान चौकात हजारो कार्यकर्ते एकत्र आले होते व तिथे निदर्शने करण्यात आली. शताब्दी चौक आणि वाडीत जमाव आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य बळप्रयोग करून परिस्थिती हाताळली. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कुणालाही दुखापत अथवा तशी अनुचित घटना नागपुरात घडली नाही. दरम्यान, अनेक ठिकाणी सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते.बसवाहतूक थांबलीमहाराष्ट्र बंदमुळे परिवहन सेवेला फटका बसला. बाहेरगावी जाणाऱ्या बसेस मध्यवर्ती बसस्थानकातून रवाना झाल्या नाही. शिवाय खासगी बसेसदेखील धावत नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांची अडचण झाली. अनेक प्रवासी तर बसस्थानकातच थांबले होते. दुसरीकडे शहर बससेवादेखील प्रभावित झाली.शाळा, महाविद्यालयांना अघोषित सुटीमहाराष्ट्र बंदमुळे शहरातील काही शाळांनी सुटी घोषित केली. त्यामुळे सकाळी अनेक विद्यार्थी शाळेत जाऊन घरी परत आले. तर अनेक शाळा-महाविद्यालये सुरू होती. परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तर अघोषित सुटीचेच वातावरण दिसून आले.विद्यापीठ केले बंदडॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’समोर निदर्शने करण्यात आली. ‘कॅम्पस’चे प्रवेशद्वारच बंद करण्यात आले.

 

 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद