शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

तुळशी विवाहनंतर वाजणार सनई चौघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 20:44 IST

विवाह सोहळ्यांना तुळशी विवाहानंतर सुरुवात होणार आहे. येत्या दोन महिन्यात विवाहासाठी १४ मुहूर्त आहे. साक्षगंध आटोपून मुहूर्तांची वाट बघणाऱ्या लग्नघरात लगबग सुरु झाली आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यात १४ विवाह मुहूर्त : मंगल कार्यालय झाले फुल्ल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जून महिन्यापासून थांबलेल्या विवाह सोहळ्यांना तुळशी विवाहानंतर सुरुवात होणार आहे. येत्या दोन महिन्यात विवाहासाठी १४ मुहूर्त आहे. साक्षगंध आटोपून मुहूर्तांची वाट बघणाऱ्या लग्नघरात लगबग सुरु झाली आहे. विवाह सोहळ्यांसाठी मंगल कार्यालयांचे बुकिंगही फुल्ल झाले आहे.दोन मनांचे मिलन घडविणारा आणि दोन कुटुंबाना जोडणारा विवाह संस्कार सोहळा समीप आला आहे. तुळशी विवाहाला ९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. १२ नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे. साधारणत: तुळशी विवाहाच्या मुहूर्तापासून विवाहांना सुरुवात केली जाते. त्या अनुषंगाने ९ नोव्हेंबरपासूनच लग्नाचा पहिला बार फुटणार आहे.गेल्यावर्षी गुरु अस्तामुळे एक महिना उशिराने लग्नसराई सुरू झाली होती. नागपुरातील प्रसिद्ध पंचांगानुसार नोव्हेंबर महिन्यात विवाहाचे ७ मुहूर्त असून मंगल कार्यालयांमध्ये बुकिंग आधीच करण्यात आले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन महिने मिळवून १४ शुभ मुहूर्त आहे. तसे वेगवेगळ्या पंचांगानुसार विवाहाचे मुहूर्त कमी जास्त आहे. डिसेंबरच्या १२ तारखेपासून गुरूचा अस्त असल्यामुळे थेट जानेवारीच्या १८ तारखेलाच विवाह मुहूर्त असल्याचे प्रसिद्ध ज्योतिष्याचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.त्या दृष्टिकोनातून शहरातील मंगल कार्यालय फुल्ल झाले आहे. शहरात साधारणत: दोनशेच्या जवळपास मंगल कार्यालय आहेत. लॉनचीही संख्या बरीच आहे. नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंतचे बुकिंग झाले आहे. मे आणि जूनचे बुकिंग सध्या सुरू आहे, असे मंगल कार्यालयाचे मालक देवदत्त फडणवीस यांनी सांगितले. नागपूरच्या प्रसिद्ध पंचांगानुसार असे आहेत मुहूर्तनोव्हेंबर ९,१०,११,१४, २०,२३,२८डिसेंबर १,२,३,६,८,११,१२जानेवारी, १८,२०,२९,३०,३१फेब्रुवारी १,४,१२,१४,१६,१८,२६,२७मार्च ३,४,११,१२,१९एप्रिल १५,१६,२६,२७मे २,५,६,८,१२,१४,१८,१९,२४,जून १४,१५,२९,३०पुढे जुलै ते ऑक्टोबरपर्यंत मुहूर्त नसल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. शुभ मुहूर्त म्हणजे चांगली वेळविवाह मुहूर्तासाठी केवळ तारखेलाच महत्त्व नाही तर त्या दिवशीची वेळ कशी आहे याला महत्त्व असते. चंद्र, शुक्र, गुरु, बुध हे शुभ ग्रह आहे. त्यांची दिशा यावरून मुहूर्त ठरतो. विवाह मुहूर्तात जी घटिका काढली जाते, तिला महत्व असते. शास्त्रात मुहूर्ताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा पत्रिकेवर जी वेळ दिली आहे, ती वेळ प्रत्येकाने पाळल्यास, विवाहाचा शुभ सोहळा शुभ ठरतो, असे डॉ. अनिल वैद्य म्हणाले.

टॅग्स :marriageलग्नnagpurनागपूर