शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार! कळमन्यात ठोकमध्ये ३० ते ४० रुपये भाव

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 19, 2023 18:35 IST

महाराष्ट्रात नवीन पीक डिसेंबरमध्ये येणार

नागपूर : टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे संकेत आहे. सध्या कांद्याचा भाव किरकोळ बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपयांपर्यंत आहे. वाढीव दरामुळे टोमॅटोप्रमाणेच लोक कांद्याची चव विसरायला लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढीव दरवामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येणार आहे. मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा, हे मुख्य कारण समजले जात आहे.

दक्षिण भारतातून आवक

यंदा महाराष्ट्रात कांद्याचे पीक उशीरा अर्थात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. सध्या कळमना बाजारात दक्षिण भारतातून म्हणजे बेंगळुरू (कर्नाटक) आणि आंध्रप्रदेशातून कांद्याची आवक सुरू आहे. आधीची २५ ट्रकची आवक आता १२ ट्रकपर्यंत कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने काहीच दिवसात भाव वाढले आहेत. ठोक बाजारात लाल कांदे दर्जानुसार ३० ते ४० रुपये भाव आहे. हे भाव १५ दिवस स्थिर राहील. सध्या कांदे संपूर्ण भारतात दक्षिण भारतातून विक्रीसाठी जात आहेत. पांढरे कांदे केवळ बेळगांव येथे निघाले आहेत. जागेवरच ५० रुपये किलो भाव आहे. त्यामुळे कळमन्यात विक्रीसाठी कुणीही बोलवित नाहीत.

डिसेंबरच्या प्रारंभी येणार माल

जळगाव, जामोद, धुळे, औरंगाबाद, चाळीसगाव, नाशिक, मराठवाडा येथील कांदे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होतील. त्यावेळी कांद्याचा दर्जा कसा राहील, हे आता सांगणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. नवीन कांदे बाजारात आल्यानंतरच भाव कमी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ग्राहकांना जास्त दरातच कांदे खरेदी करावे लागतील. जानेवारी महिन्यात गुजरात येथील कांदे बाजारात येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर भाव स्थिर होतील. ऑक्टोबरअखेर आणि डिसेंबर या सणासुदीच्या महिन्यात वाढीव दर कमी होतील. यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कांदा पेरणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे पिकावर परिणाम झाली आहे. त्यानंतरही कांद्याची टंचाई जाणवणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

जुन्या कांद्याचा साठा संपत आला आहे. तर महाराष्ट्रातील नवीन कांदे बाजारात येण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाववाढ झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातून आणि जानेवारीत गुजरातेतील कांदा कळमन्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. आवक वाढल्यानंतर भाव कमी होण्याची अपेक्षा आहे.

- गौरव हरडे, अध्यक्ष, कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशन.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूरvegetableभाज्या