शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शपथविधीनंतर नागपुरात भाजपाकडून जोरदार जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांच्या शपथग्रहण समारंभानंतर नागपुरात भाजपातर्फे जोरदार जल्लोष करण्यात आला. नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे तर कार्यकर्त्यांमध्ये दुप्पट उत्साह दिसून येत होता. भाजपाच्या गणेशपेठ येथील शहर कार्यालयासमोर आतषबाजी करण्यात आली तसेच मिठाईचेदेखील वाटप झाले.

ठळक मुद्देआमदारांचीदेखील उपस्थिती : आतषबाजी, मिठाईचे झाले वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांच्या शपथग्रहण समारंभानंतर नागपुरात भाजपातर्फे जोरदार जल्लोष करण्यात आला. नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे तर कार्यकर्त्यांमध्ये दुप्पट उत्साह दिसून येत होता. भाजपाच्या गणेशपेठ येथील शहर कार्यालयासमोर आतषबाजी करण्यात आली तसेच मिठाईचेदेखील वाटप झाले.शपथविधी झाल्यावर लगेच ढोलताशे वाजविण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. भाजपाच्या कार्यालयात शपथविधी समारंभाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. यावेळी आमदार, नगरसेवक यांच्यासह पक्ष पदाधिकारी एकत्र आले होते. यावेळी भाजपाचे विदर्भ प्रांत संघटनंत्री उपेंद्र कोठेकर, आ.अनिल सोले,आ.मिलिंद माने, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्यासह श्रीकांत देशपांडे, किशोर पलांदूरकर, भोजराज डुंबे, गुड्डू त्रिवेदी, प्रमोद पेंडके, अर्चना डेहनकर, देवेन दस्तुरे, शिवानी दाणी, जयप्रकाश गुप्ता, नवनीतसिंह तुली, चंदन गोस्वामी, डॉ. कीर्तिदा अजमेरा, मनीषा काशीकर, संजय ठाकरे, किशन गावंडे, महेंद्र कटारिया, प्रताप मोटवानी, डॉ. विंकी रुघवानी, बापू चिखले, गजेंद्र पांडे इत्यादी उपस्थित होते. बडकस चौकातदेखील थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती व तेथेदेखील कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली.१ जून रोजी गडकरींचा सत्कारदरम्यान, शपथविधी समारंभाच्या अगोदर शहर भाजपाची विशेष बैठक बोलविण्यात आली. १ जून रोजी नितीन गडकरी यांचे शहरात आगमन होणार आहे. यावेळी भाजपातर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात येईल, असे यात निश्चित झाले. बैठकीला भाजपाच्या शहर कार्यकारिणीचे सदस्य, मंडळ व विविध आघाड्यांचे अध्यक्ष, महामंत्री सहभागी झाले होते. १ जून रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात येणार आहे. तसेच श्रमपरिहार, आरोग्य शिबिर व धार्मिक कार्यक्रमदेखील होतील, असे पक्षाचे महानगर प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर