शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सेनेनंतर भाजपचाही काटोलवर दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:15 IST

काटोल विधानसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी भाजपने दावा केला आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणानंतर उमेदवार ठरणार जिल्हा भाजपच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल विधानसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी भाजपने दावा केला आहे. काटोल मतदारसंघात भाजपची ताकद आहे. २०१४ च्या निवडणुकीत काटोलमध्ये भाजप स्वबळावर लढला आणि यात यश आले. त्यामुळे पोटनिवडणूकही ताकदीने लढली गेली पाहिजे, अशा भावना काटोल मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.काटोल विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महाल येथील जिल्हा कार्यालयात बैठक झाली. जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला पदाधिकाऱ्यांनी काटोलची जागा सेनेसाठी सोडू नये अशी भावना व्यक्त केली. २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात मतदारांनी भाजपला कौल दिला आहे. त्यामुळे पोटनिवडणूकही पक्षाने लढावावी अशी मागणी लावून धरण्यात आली.मंगळवारी शिवसेनेच्या काटोल मतदारसंघातील पदाधिकाºयांनी मुंबई येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेत काटोलची जागा शिवसेनेने लढवावी अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे शिवसेनेच्या दाव्यावर भाजपची काय भूमिका राहील यादृष्टीने बुधवारच्या बैठकीकडे मतदार संघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. शेवटी काटोलची पोटनिवडणूक भाजपच लढविणार असा निर्णय घेण्यात आला. यासोबतच पदाधिकाºयांनी भावना प्रदेशाध्यक्षांकडे पोहोचविण्याचे निश्चित करण्यात आले. काटोलमध्ये कुणाला उमेदवारी देण्यात यावी, याबाबतही पदाधिकाºयांनी बैठकीत मते मांडली. यात काही पदाधिकाºयांनी स्थानिक उमेदवाराला काटोलमध्ये प्राधान्य देण्याची विनंती जिल्हाध्यक्षाकडे केली. काटोलसाठी नगर परिषदेचे सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर, भाजपचे काटोल विधानसभा प्रभारी अविनाश ठाकरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व वित्त सभापती उकेश चव्हाण आणि काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे इच्छुक आहेत. पदाधिकाºयांची मते जाणून घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष पोतदार यांनी काटोल मतदारसंघात उमेदवारी देण्याबाबत पक्षाकडून सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती दिली. सर्वेक्षणाचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सोपविला जाईल. यानंतर पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून काटोलच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे पोतदार यांनी बैठकीत स्पष्ट केल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी २१ मार्चची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक