प्रदीर्घ कालावधीनंतर इग्नूच्या केंद्राला मिळाली जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:07 AM2021-06-19T04:07:44+5:302021-06-19T04:07:44+5:30

नागपूर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) च्या प्रादेशिक केंद्राच्या स्थायी इमारतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ...

After a long period of time, the center of IGNOU got the land | प्रदीर्घ कालावधीनंतर इग्नूच्या केंद्राला मिळाली जमीन

प्रदीर्घ कालावधीनंतर इग्नूच्या केंद्राला मिळाली जमीन

googlenewsNext

नागपूर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) च्या प्रादेशिक केंद्राच्या स्थायी इमारतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. पी. शिवस्वरुप यांना ओंकारनगर येथील जमीन इमारत तयार करण्यासाठी हस्तांतरित केली आहे. केंद्राच्या इमारतीचे बांधकामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. शिवस्वरुप यांनी याबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘एप्रिल महिन्यात याबाबतची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. येथे लवकरच इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. राज्य शासनाने जमीन अधिग्रहित केल्यानंतर केंद्राच्यावतीने आवश्यक २.५० कोटी रुपये जमा करण्यात आले होते. प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे जमिनीचे हस्तांतरण करण्यात अडचण येत होती. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मदत मागण्यात आली. त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून जिल्हाधिकाऱ्यांना जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होते. त्यानंतर ही जमीन देण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे इग्नूने स्थायी प्रादेशिक केंद्र तयार करण्यासाठी राज्य शासनाकडे जमिनीची मागणी केली होती. तीन वर्षांपूर्वी शासनाने जमीन अधिग्रहित झाल्यानंतरही हस्तांतरित केली नव्हती.

.

Web Title: After a long period of time, the center of IGNOU got the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.