शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
5
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
6
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
7
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
10
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
11
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
12
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
13
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
14
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
15
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
16
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
17
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
18
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
19
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
20
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

निवडणुकीनंतर राफेल घोटाळ्याची चौकशी होणार; राहुल गांधींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 19:34 IST

चीनमध्ये मेड इन विदर्भ दिसेल. विदर्भाला आम्ही सिंगापूर, दुबई सारखे हब बनवू इच्छित होतो. पण यांनी कामच केले नाही, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर राफेलसारख्या घोटाळ्यांची चौकशी होईल. मोदींनी प्रक्रियाच नष्ट केली. कारवाई तर होणारच. घोटाळा कुणी केला हे पर्रिकर यांना माहीत होते. चीनमध्ये मेड इन विदर्भ दिसेल. विदर्भाला आम्ही सिंगापूर, दुबई सारखे हब बनवू इच्छित होतो. पण यांनी कामच केले नाही, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

 नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या मतदारसंघात कस्तुचंद पार्कवर राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी राफेल घोटाळा, अंबानी कनेक्शन आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सडकून टीका केली. 

अनिल अंबानींचं ४५ हजार कोटींचं कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांचं कर्ज माफ का करत नाही? असा सवाल करत त्यांनी ज्या कंपनीला विमान बनवण्याचा काहीही अनुभव नाही, ज्याच्याकडे पाच पैसेसुद्धा नाहीत त्यांना मोदी सरकारने राफेलचं कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप केला. तसेच या घोटाळ्यांची चौकशी करण्याचा इशाराही राहुल यांनी दिला. 

तसेच गरिबीवर काँग्रेस पक्षाचा सर्जीकल स्ट्राईक आहे. भारतातील गरीब २०% नागरिकांना म्हणजेच ५ कोटी कुटुंबातील २५ कोटी नागरिकांच्या खात्यात वर्षाला ७२००० रुपये जमा करणार. ही योजना आपण देशाच्या अर्थतज्ज्ञांसोबत मिळून बनविल्याचा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्वासन देतात, आम्ही काम करतो. 72000 रुपयांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होणार नाही. मी लोकांसोबत दूरपर्यंतचे संबंध बनवायला आलो आहे. मी 2-3 दिवसांसाठी राजकारण करायला आलेलो नाही. देशात 12 हजार रुपये प्रति महिने मिळकत झालीच पाहिजे. आम्ही गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करणार. अर्जुनासारखे माझे लक्ष्य ठरले आहे. 20 टक्के गरीब लोकांना 5 वर्षात 3 लाख 60 हजार देणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

आपला देश बंधुभावाचा आहे. हिंसा करा असे कुठेच लिहिले नाही. गीतेत पण नाही. पण मोदी केवळ द्वेषाची भाषा बोलतात. अडवाणी हे गुरू होते, त्यांची अवस्था पहा . हा हिंदू धर्म आहे का ? मी जे म्हणतो ते मनापासून म्हणतो. आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. देशातून गरिबी नेहमीसाठी हटविल. देश चीनसोबत स्पर्धा करू शकतो. खोटं ऐकलं,  आता सत्य ऐका. अडवाणी यांची हालत पहा, गुरुस्थानी आहेत, पण दुर्लक्षित ठेवले आहे, असा आरोपही त्यांनी मोदी आणि शहा यांच्यावर केला. तसेच महिलांना शक्ती देणार. 33 टक्के आरक्षण देणार विधिमंडळ व संसदेत. महिलांना नोकरीमध्ये 33 टक्के आरक्षण मिळणार, असे आश्वासन दिले. 

यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भाषणे झाली. राहुल गांधी हे देशाचे खरे शिपाई. मोदी सरकारच्या काळात सर्व काळा पैसा गुजरातमध्ये गेला. राफेलची फाईल दाबून ठेवली. सौगंध मुझे अंबानी की, मै फाईल नही मिलने दुंगा, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मोदींवर टीका केली. 

तर देशात 5 वर्षात शेतकरी, व्यापारी संकटात. बेरोजगारी वाढली. भाजपचे लोकांना सत्तेची धुंदी चढली आहे . देशाचा भ्रमनिरास झाला आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीnagpur-pcनागपूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीNana Patoleनाना पटोलेRafale Dealराफेल डील