दारु पिण्यावरून टोकल्याने वडील अन भावावरच कुऱ्हाडीने वार
By योगेश पांडे | Updated: March 27, 2024 15:23 IST2024-03-27T15:22:53+5:302024-03-27T15:23:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दारू पिण्यावरून टोकल्याने संतप्त झालेल्या आरोपीने जन्मदाते वडील व लहान भावावरच कुऱ्हाडीने वार करत ...

दारु पिण्यावरून टोकल्याने वडील अन भावावरच कुऱ्हाडीने वार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारू पिण्यावरून टोकल्याने संतप्त झालेल्या आरोपीने जन्मदाते वडील व लहान भावावरच कुऱ्हाडीने वार करत जखमी केले. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
किशोर ज्ञानेश्वर उरकुडे (४०, कानोलीबारा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला दारुचे व्यसन असून घरी येऊन शिवीगाळ करतो. २५ मार्च रोजी सायंकाळी तो दारू पिऊन घरी आला. तो आरडाओरड करत असल्याने त्याचे वडील ज्ञानेश्वर यांनी त्याला शांत राहण्यास सांगितले. यावरून किशोर संतापला व त्याने वडीलांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर कुऱ्हाडीने डोके व कानाजवळ वार केला. हे पाहून लहान भाऊ अतुल धावून आला. मात्र किशोरने त्याच्या हातावरदेखील वार केले. त्यानंतर तो फरार झाला. दोन्ही जखमींना एम्समध्ये नेण्यात आले. अतुलच्या तक्रारीवरून किशोरविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.