आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक ट्रस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST2021-07-19T04:07:04+5:302021-07-19T04:07:04+5:30
नागपूर : आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक ट्रस्टच्यावतीने अण्णाभाऊ साठे स्मारक स्मृतीस्थळ, दीक्षाभूमी येथे अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन ...

आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक ट्रस्ट
नागपूर : आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक ट्रस्टच्यावतीने अण्णाभाऊ साठे स्मारक स्मृतीस्थळ, दीक्षाभूमी येथे अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. विकास ठाकरे यांना ट्रस्टच्यावतीने निवेदन देण्यात आले. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी स्मारक भवन, ग्रंथालय व निवासी अभ्यासिकेसाठी पुतळ्याच्या शेजारील खाली जागा आरक्षित करून तेथे बांधकाम करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी विनायक इंगोले, राजेश खंडारे, भारत डोंगरे, विजय डोंगरे, रवींद्र खडसे, पद्माकर बावणे, प्रा. राहुल हिवराडे, गुरुदास बावणे, रवी वानखेडे, संजय ठोसर, दुर्गेश बावणे, प्रवीण थोरात, रोशन ठोसर, सचिन इंगोले, सागर जाधव, सचिन काळे, शिवशंकर ताकतोडे, मुरली रणखाम, गणेश साळवे, ॲड. सचिन मेकाले, विक्की कावळे, ऋषी अव्हाडकर, भारत शिंदे, भारती कांबळे, चेतन शेंडे, सुरेश खंडारे, सविता तरारे उपस्थित होते.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ()
नागपूर : लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, नागपूर शहरच्या वतीने दीक्षाभूमी चौक येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला प्रदेश कोषाध्यक्ष एस.टी. पाझारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष आशीर्वाद कापसे, दक्षिण-पश्चिम विधानसभा अध्यक्ष सी.डी. वाघमारे, महासचिव विलास पारखंडे, डी.जे. मेश्राम, चंद्रविलास लोणारे, प्रवीण खापर्डे, अरिहंत खैरकर, सुनंदा गायकवाड, तुलसीदास आठवले उपस्थित होते.
.............