शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

ऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी वकिलांचा उडाला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 8:33 PM

Nyayalay, online,advocate जिल्हा व सत्र न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालयांतील ऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी अनेक वकिलांचा गोंधळ उडाला. काहींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या लिंकद्वारे सुनावणीत सहभागी होता आले नाही तर, जे सहभागी होऊ शकले त्यापैकी बरेचजनांना पुढे काय करावे हे सूचले नाही. याशिवाय वकिलांना नेट कनेक्शन तुटणे, खरखर आवाज येणे, व्हिडिओ एरर अशा विविध तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले.

ठळक मुद्दे जिल्हा न्यायालय : विविध तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालयांतील ऑनलाईन कामकाजाच्या पहिल्या दिवशी अनेक वकिलांचा गोंधळ उडाला. काहींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या लिंकद्वारे सुनावणीत सहभागी होता आले नाही तर, जे सहभागी होऊ शकले त्यापैकी बरेचजनांना पुढे काय करावे हे सूचले नाही. याशिवाय वकिलांना नेट कनेक्शन तुटणे, खरखर आवाज येणे, व्हिडिओ एरर अशा विविध तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले.

कोरोनाचा प्रसार व संभाव्य हानी टाळण्यासाठी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी शनिवारी परिपत्रक जारी करून १७ ते ४ जूनपर्यंत सुधारित एसओपी लागू केली आहे. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय, लघुवाद न्यायालय, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मुख्य न्याय दंडाधिकारी व प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयामध्ये सोमवारपासून  ऑनलाईन कामकाज सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी न्यायालयनिहाय वेगवेगळ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग लिंक पुरवण्यात आल्या आहेत. सदर न्यायालयांत ऑनलाईन सुनावणीचा हा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे प्रामुख्याने या न्यायालयांत वकिली करणाऱ्या वकिलांना  ऑनलाईन कामकाजाचा पूर्वानुभव नाही. अनेक वकिलांकडे  ऑनलाईन कामकाजाकरिता आवश्यक तांत्रिक सुविधाही नाहीत. परिणामी, अशा वकिलांचा गोंधळ उडाला. तांत्रिक सुविधा नसलेल्या वकिलांना सिव्हिल लाईन्स येथील न्यायिक अधिकारी प्रशिक्षण संस्थेत उभारण्यात आलेल्या न्याय कौशल केंद्रातून ऑनलाईन सुनावणीत सहभागी होण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी वकिलांना धावपळ करावी लागली.

फिजिकल सुनावणीच्या पर्यायाची मागणी

 ऑनलाईन कामकाजादरम्यान उडालेल्या गोंधळामुळे अनेक वकिलांनी फिजिकल सुनावणीचा पर्याय उपलब्ध ठेवण्याची मागणी केल्याची माहिती अ‍ॅड. कमल सतुजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तसेच, याकरिता आवश्यक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

 ऑनलाईन सुनावणीची सवय होईल

 ऑनलाईन सुनावणीचा पहिला दिवस असल्यामुळे वकिलांचा गोंधळ उडाला. त्यांना हळुहळु या पध्दतीची सवय होईल.  ऑनलाईन कामकाज न्यायव्यवस्थेचे भविष्य आहे. त्यामुळे तांत्रिक सुविधा नसलेल्या वकिलांसाठी आता न्याय मंदिर परिसरातही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

-अ‍ॅड़ कमल सतुजा, अध्यक्ष, जिल्हा विधिज्ञ संघटना.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूरonlineऑनलाइन