अॅड. सुहासिनी साखरे यांचे अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:56 IST2017-09-15T00:55:49+5:302017-09-15T00:56:03+5:30
रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर कार धडकून अॅड. सुहासिनी त्र्यंबकराव साखरे (४४) रा. गणेश अपार्टमेंट खामला, नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला.

अॅड. सुहासिनी साखरे यांचे अपघाती निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर कार धडकून अॅड. सुहासिनी त्र्यंबकराव साखरे (४४) रा. गणेश अपार्टमेंट खामला, नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर-सावनेर मार्गावरील पिपळा (डाकबंगला) परिसरात गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडली.
ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सीमा साखरे यांच्या त्या कन्या होत. कायदेविषयक प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीला मार्गदर्शन करणाºया प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या अॅड. सुहासिनी साखरे यांच्या निधनामुळे सीमातार्इंचा सामाजिक वारसा हरविला आहे.
या घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून अॅड. साखरे यांचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. अॅड. साखरे या अविवाहित होत्या.
सात वर्षांआधी त्या लंडनमध्ये वकिली व्यवसाय करायच्या. सध्या त्या नागपुरात स्थायिक झाल्या होत्या. व्यवसायासंबंधाने पुढच्या महिन्यात त्या सॅनफ्रान्सिस्कोला जाणार होत्या. परंतु त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
अॅड. सुहासिनी साखरे या एमएच-३१/डीव्ही-७१८० क्रमांकाच्या नॅनो कारने सावनेरहून नागपूरकडे येत होत्या. पिपळा (डाकबंगला) परिसरातील पुलावर रोडच्या कडेला एमएच-४०/एन-३४५३ क्रमांकाचा ट्रक नादुरुस्त स्थितीत उभा होता. दरम्यान, अॅड. साखरे यांची कार या ट्रकवर मागून जोरात धडकली. त्यात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.