दत्तक प्रक्रिया झाली आॅनलाईन

By Admin | Updated: September 17, 2015 03:55 IST2015-09-17T03:55:03+5:302015-09-17T03:55:03+5:30

दत्तक प्रक्रियेच्या नावाखाली गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्याने केंद्र सरकार दत्तक प्रक्रिया स्वत: राबवीत आहे.

Adoption process is online | दत्तक प्रक्रिया झाली आॅनलाईन

दत्तक प्रक्रिया झाली आॅनलाईन


नागपूर : दत्तक प्रक्रियेच्या नावाखाली गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्याने केंद्र सरकार दत्तक प्रक्रिया स्वत: राबवीत आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने दत्तक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटी’ स्थापन केली आहे. १ आॅगस्टपासून देशभरातील दत्तक मुलांचे आणि दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांची आॅनलाईन नोंदणी करून दत्तकगृहाचे अधिकार काढले आहे.
पूर्वी दत्तक घेण्यासाठी पालक दत्तकगृहात जाऊन नोंदणी करीत होते. तेव्हा पालकांच्या आर्थिक स्थितीनुसार ही प्रक्रिया होत होती. पालकांची आर्थिक स्थिती संपन्न असेल तर त्यांना बालकही लवकरात लवकर व त्यांच्या आवडीनुसार मिळत होते. मात्र या प्रक्रियेत काही गैरव्यवहार झाल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्याने, १ आॅगस्टपासून नवीन नियमावली लागू केली आहे. देशभरातील सर्व अनाथालयाला आॅनलाईन जोडले आहे. अनाथालयात येणाऱ्या बालकांचा फोटो, त्याचा वयोगट, त्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल आदी संपूर्ण माहिती वेबसाईटवर डाऊनलोड करायची आहे. तसेच दत्तक घेण्यास इच्छुक असणाऱ्या पालकांनीसुद्धा ६६६.ंङ्मिस्र३्रङ्मल्ल्रल्ल्िरं.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे. नोंदणी केलेल्या पालकांना क्रमानुसार सहा बालकांमधून एका बालकाची निवड करण्याची संधी मिळणार आहे. ही बालके देशभरातील वेगवेगळ्या दत्तकगृहातील राहतील. पालकांनी एकाची निवड केल्यानंतर संबंधित दत्तकगृहाशी संपर्क साधायचा आहे. सहापैकी एकाही बालकाची निवड न केल्यास, पुन्हा पालकाला वेटिंगवर राहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Adoption process is online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.