डॉक्टरच्या मुलाला एमडीत ॲडमिशन करून देण्याची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST2021-03-15T04:07:48+5:302021-03-15T04:07:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुलाची एमडीला ॲडमिशन करून देण्याची थाप मारून दोन भामट्यांनी शहरातील एका ज्येष्ठ डॉक्टरकडून ११ ...

Admission to the doctor's son for admission in MD | डॉक्टरच्या मुलाला एमडीत ॲडमिशन करून देण्याची थाप

डॉक्टरच्या मुलाला एमडीत ॲडमिशन करून देण्याची थाप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुलाची एमडीला ॲडमिशन करून देण्याची थाप मारून दोन भामट्यांनी शहरातील एका ज्येष्ठ डॉक्टरकडून ११ लाख ३७ हजार रुपये हडपले. अभय यशवंत भलमे (वय ६४) असे फिर्यादी डॉक्टरचे नाव आहे. ते चर्मरोगतज्ज्ञ असून धंतोलीत त्यांचे डॉ. भलमे क्लिनिक आहे. त्यांचा मुलगाही डॉक्टर आहे.

एका मित्राच्या माध्यमातून आरोपी समीर टोणपे (वय ४०, रा. हनुमाननगर) आणि देवेंद्र गोवर्धन टवले (वय ४०, रा. विठ्ठलनगर मानेवाडा) यांच्याशी डॉ. भलमे यांची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आपले अनेक नेत्यांसोबत तसेच वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित मंडळींशी घनिष्ठ संबंध असल्याची थाप मारून आपण कुणाचीही एमबीबीएस, एमडीला ॲडमिशन करून देऊ शकतो, असे आरोपी म्हणाले होते. त्यांचे वागणे-बोलणे प्रभावी वाटल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून भलमे यांनी आपल्या मुलाच्या ॲडमिशनची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. दरम्यान, वेगवेगळी सबब सांगून आरोपी टोणपे आणि टवले यांनी भलमेंकडून १० फेब्रुवारी २०१९ ते २९ डिसेंबर २०१९ या कालावधीत एकूण ११ लाख ३७ हजार रुपये घेतले. नंतर मात्र आरोपी त्यांना टाळू लागले. ॲडमिशनचा विषय काढताच ते असंबद्ध उत्तरे देत होते. त्यांच्याकडून आपले काम होणार नाही, याची खात्री पटल्याने भलमेंनी त्यांना आपली रक्कम परत मागितली असता आरोपी टाळाटाळ करू लागले. नंतर काही दिवसांनी त्यांनी प्रतिसादच देणे बंद केले. आरोपी टोणपे आणि टवलेने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने भलमे यांनी धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. चाैकशीअंती शनिवारी या प्रकरणात धंतोली पोलिसांनी आरोपी टोणपे आणि टवलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

----

मोठे रॅकेट सक्रिय

एमबीबीएस तसेच एमडीला ॲडमिशन करून देण्याची थाप मारून लाखोंची रोकड उकळणारे रॅकेट नागपुरात सक्रिय आहे. या रॅकेटने अनेक पालकांची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे, धंतोली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात कमालीची दिरंगाई केली. त्यामुळे आरोपी फरार झाल्याची चर्चा आहे.

----

Web Title: Admission to the doctor's son for admission in MD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.