कॉटन मार्केटमध्ये वाढलेल्या गर्दीला प्रशासनानेच आवरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:09 IST2021-03-17T04:09:33+5:302021-03-17T04:09:33+5:30
- आडतिया असोसिएशनची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीत अनेकांचे रोजगार टांगणीला लागले ...

कॉटन मार्केटमध्ये वाढलेल्या गर्दीला प्रशासनानेच आवरावे
- आडतिया असोसिएशनची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीत अनेकांचे रोजगार टांगणीला लागले आहेत. कॉटन मार्केटमध्येही याचा परिणाम दिसून येत आहे. मात्र, कॉटन मार्केटमध्ये या काळात वाढत असलेल्या गर्दीला आडतिया असोसिएशन जबाबदार नसल्याची घोषणा महात्मा फुले सब्जी बाजार आडतिया असोसिएशनने आज केली आहे.
टाळेबंदीमुळे अनेक ठिकाणचे बाजार बंद पडले आहेत. त्यामुळे, पोटापाण्यासाठी अनेक जण कॉटन मार्केटमधून भाज्यांची खरेदी करून तेथील मैदानात व पार्किंगच्या जागेवर भाजीविक्रीचे काम करत आहेत. यामुळे मात्र, असोसिएशनच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे उपयुक्त उपाययोजना कराव्या अशा मागणीचा ठराव आज पार पडलेल्या असोसिएशनच्या बैठकीत पारित करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष शेख हुसेन, सचिव राम महाजन, सदस्य काळे, किशोर नागपुरे, राकेश बानाईत, संजुले, राजेश बोलाखे, शेषराव गभणे, राजेश मोहोड, अनिल मांजरे, आशिष जुनघरे उपस्थित होते.
...............