विद्यार्थ्यांकडून प्रशासनाची पोलखोल

By Admin | Updated: September 13, 2014 02:44 IST2014-09-13T02:44:51+5:302014-09-13T02:44:51+5:30

सुरुवातीचे दोन दिवस ‘नॅक’ (नॅशनल असेसमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल) समितीसमोर ‘आॅल इज वेल’ असा ‘परफॉर्मन्स’ देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ...

Administration policemen from the students | विद्यार्थ्यांकडून प्रशासनाची पोलखोल

विद्यार्थ्यांकडून प्रशासनाची पोलखोल

नागपूर : सुरुवातीचे दोन दिवस ‘नॅक’ (नॅशनल असेसमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल) समितीसमोर ‘आॅल इज वेल’ असा ‘परफॉर्मन्स’ देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनासाठी शुक्रवारचा दिवस फारसा चांगला ठरला नाही. ‘नॅक’ समितीच्या सदस्यांसमोर निरनिराळ्या विभागांतील विद्यार्थ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. ‘नॅक’ समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांची बाजू विस्तृतपणे ऐकून घेतली. विद्यापीठाने वेगवेगळ्या बाबतीत केलेल्या दाव्यांची विद्यार्थ्यांच्या स्पष्टोक्तीने पोलखोल झाली.
‘नॅक’ समितीने सुरुवातीचे दोन दिवस विद्यापीठातील निरनिराळ्या विभागांची पाहणी केली होती. कर्नाटक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.ए.एम.पठाण यांच्या नेतृत्वाखालील ‘नॅक’ समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी गुरुनानक भवन येथे दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी विद्यापीठातील अधिकाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. विद्यापीठातील सत्य स्थिती कथन करावी, सर्वांची नावे गुप्त राहतील, असे आश्वासन समितीच्या सदस्यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकानंतर एक समस्या मांडल्या.
बहुतांश विद्यार्थ्यांनी विभागांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात शिक्षक नसल्याचा मुद्दा मांडला. शिक्षकच नाही, त्यामुळे नियमित वर्ग होत नाही. एका विभागाचे विभागप्रमुख तर कधीच वर्गावर येत नाही असे विद्यार्थ्यांनी सांगितले. यासोबतच अनेक विभागात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असेदेखील विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यापीठात ‘प्लेसमेंट’ची टक्केवारी कशी आहे, असा प्रश्न समितीच्या सदस्यांनी विचारला. परंतु विद्यापीठातील ‘प्लेसमेंट सेल’ केवळ नावापुरताच असून त्याचा विद्यार्थ्यांना काहीही फायदा नाही, असे स्पष्टपणे विद्यार्थ्यांनी सांगितले. ‘नॅक’ समितीच्या सदस्यांनी निरनिराळ्या मुद्यांवर विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतली.
काणे सरांच्या ‘क्लास’चा फायदा नाही
‘नॅक’ समितीसोबत होणाऱ्या संवादासाठी विद्यापीठाने विशेष तयारी केली होती.
‘आयक्यूएसी’तर्फे (इंटर्नल क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स सेल)काही दिवसांअगोदर याची रंगीत तालीम घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना कुठल्या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तर द्यायचे आहे याचे मार्गदर्शन ‘आयक्यूएसी’ संचालक डॉ. सिद्धार्थ काणे यांनी केले होते. परंतु विद्यापीठातील समस्यांमुळे सहन कराव्या लागणाऱ्या मनस्तापातून अखेर विद्यार्थ्यांनी समस्या मांडल्याच.(प्रतिनिधी)

Web Title: Administration policemen from the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.