शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

‘६०:४०’ ला प्रशासनाचा ब्रेक

By admin | Updated: July 29, 2016 02:43 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदापासून ‘६०:४०’ परीक्षा प्रणाली सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस होता.

कुलगुरुंचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ बारगळला : ‘मास कॉपी’च्या भीतीपोटी घेतला निर्णय नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदापासून ‘६०:४०’ परीक्षा प्रणाली सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस होता. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचे हे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होते. परंतु ‘मास कॉपी’चा धोका लक्षात घेता या प्रणालीला सुरू होण्याअगोदरच ‘ब्रेक’ लावण्याचा कुलगुरूंनीच निर्णय घेतला आहे. नागपूर विद्यापीठावरील परीक्षेचा ताण लक्षात घेता, यंदापासून ‘६०:४०’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार ६० टक्के गुणांची परीक्षा विद्यापीठाकडून घेण्यात येणार होती. परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात येणार होते, तर ४० टक्के गुणांच्या परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांकडे देण्यात येणार होती. यामुळे विद्यापीठावरील ताण कमी होऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयार होतील, अशी विद्यापीठाची भूमिका होती. परंतु ज्यावेळी अधिकाऱ्यांनी खोलात जाऊन विचार केला तेव्हा या प्रणालीचे दुष्परिणाम समोर आले. वस्तुनिष्ठ प्रणालीत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांप्रमाणे ‘ओएमआर’ प्रणालीत उत्तरे द्यायची होती, म्हणजेच केवळ योग्य उत्तराच्या पर्यायासमोर खूण करायची होती. हा वस्तुनिष्ठ पेपर ‘आॅफलाईन’ राहणार होता. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रश्नांचा वेगळा क्रम असणारा पेपर काढणे कठीण होते. वस्तुनिष्ठ पेपरमध्ये ‘मास कॉपी’ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. एखाद्या केंद्रावरून प्रश्न ‘व्हॉटस् अ‍ॅप’ किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परीक्षा केंद्राबाहेर गेले तर त्यांची उत्तरे सहज मिळणे शक्य होते. या उत्तरांना केवळ खूण करण्यासाठी ५ मिनिटांचा अवधी पुरेसा आहे. विशेषत: ग्रामीण भागात याचा जास्त धोका होता, शिवाय संबंधित निर्णय हा धोरणात्मक निर्णयात मोडतो. सध्या प्राधिकरण अस्तित्वात नसल्यामुळे पुढे विद्यापीठ अडचणीत येण्याची शक्यता होती. (प्रतिनिधी)