अतिरिक्त १६७ शिक्षकांचे समायोजन
By Admin | Updated: October 1, 2014 00:49 IST2014-10-01T00:49:00+5:302014-10-01T00:49:00+5:30
जिल्ह्यातील खासगी शाळांवरील ७८८ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यातील १६७ शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्याची माहिती मंगळवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण

अतिरिक्त १६७ शिक्षकांचे समायोजन
स्थायी समिती बैठक : शासन निर्णयानुसार कार्यवाहीचे निर्देश
नागपूर : जिल्ह्यातील खासगी शाळांवरील ७८८ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यातील १६७ शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्याची माहिती मंगळवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शासन निर्देशानुसार समायोजन कार्यवाही करण्याच्या सूचना अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिल्या. बैठकीत २२ आॅगस्टच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचे इतिवृत्त कायम करण्यात आले.
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना शासन निर्णयानुसार वेतन सुरू ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात अल्पसंख्यक भाषिक दर्जा असलेल्या ५७ शाळा आहेत. यात २४ उर्दू, २६ ख्र्र्रिश्चन ५ हिंदी भाषिक व एक पारशी आहे. यातील बहुसंख्य शाळांनी अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना ५० टक्के प्रवेश आवश्यक आहे. परंतु बहुसंख्य शाळांनी या निकषाची पूर्तता केलेली नाही. अशा शाळांचा अल्पसंख्य भाषिक दर्जा काढण्याचा निर्णय मागील बैठकीत घेण्यात आला होता. यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
वलनी येथील बौद्ध समाजाच्या दफन भूमीसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर बंधारा बांधण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात १७२ बोरवेलची कामे क रण्यात आली आहेत. ३८ बोरवेलची कामे प्रलंबित आहेत. मागील बैठकीत ही कामे तातडीने करण्याचे निर्देश दिले होते. अपूर्ण कामे संबंधित कंत्राटदारांनी पूर्ण करण्याचे ग्वाही द्यावी. त्याशिवाय संबंधित कंत्राटदारांना बील देऊ नये असा निर्णय घेण्याची सूचना केली.
बैठकीला उपाध्यक्ष शरद डोणेकर, रूपराव शिंगणे, पद्माकर कडू यांच्यासह सदस्य, अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)