शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कुणी खोके वाटतंय, कुणी पेढे; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 17:46 IST

विद्यमान सरकार केवळ ४० गद्दारांसाठी काम करत आहे. त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही, अशी टीका त्यांनी केली.

नागपूर : ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत नव्हे तोच नेत्यांकडून आपापल्या पक्षाचा विजय झाल्याचे म्हणत आमचाच पक्ष श्रेष्ठ असे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीवर असल्याचा आनंद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात पेढे वाटून व्यक्त केला. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी कुणी खोके वाटतंय तर कुणी पेढे असा खोचक टोला लगावला. यासोबतच विद्यमान सरकार केवळ ४० गद्दारांसाठी काम करत आहे. त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही, अशी टीका त्यांनी केली.

सीमावादावर राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री उत्तर द्यायला तयार नाही. एका राज्याचे मुख्यमंत्री या मुद्यावर आक्रमक असताना दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री बोलायलादेखील तयार नाही, असे पहिल्यांदाच होत आहे. जो प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुटायला हवा तो रस्त्यावर मांडण्यात येत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

खोटारडे सरकार सरपंचपदाचीही खोटी आकडेवारी देताहेत - नाना पटोलेंची टीका

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

राज्यातील जनता आमच्या पाठिशी

'आजचा निकाल म्हणजे, गेल्या सहा महिन्यांच्या आमच्या कारभारावर ग्रामीण जनतेने दिलेली आम्हाला पसंती आहे. यामुळे मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. यापुढेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, शिंदे सरकार ग्रामीण जनतेच्या पाठीशी उभे राहिल आणि त्यांच्या इच्छा पुर्ण करेल,' अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनgram panchayatग्राम पंचायतBJPभाजपा