जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा : वनविभागाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 09:36 PM2020-05-08T21:36:58+5:302020-05-08T21:41:06+5:30

कोरोनाच्या प्रकोपाने इतर गोष्टींचा उल्लेख गौण ठरला असला तरी नैसर्गिक घटकांच्या बदलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मे महिना सुरू झाला आणि उन्हाचा प्रकोप आता तीव्रतेने जाणवायला लागला आहे. अशावेळी वन्यजीवांसाठी जंगलात पाण्याची उपलब्धता कमी झालेली असते. मात्र जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.

Adequate water storage in forest water bodies | जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा : वनविभागाचा दावा

जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा : वनविभागाचा दावा

Next
ठळक मुद्देवर्षभर पावसाची हजेरी फळाला, टँकरनेही पुरवठा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या प्रकोपाने इतर गोष्टींचा उल्लेख गौण ठरला असला तरी नैसर्गिक घटकांच्या बदलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मे महिना सुरू झाला आणि उन्हाचा प्रकोप आता तीव्रतेने जाणवायला लागला आहे. अशावेळी वन्यजीवांसाठी जंगलात पाण्याची उपलब्धता कमी झालेली असते. मात्र जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. यावर्षी पावसाने वर्षभर मेहेरबानी केली असल्याने नैसर्गिक आणि कृ त्रिम पाणवठे फुल्ल असून प्राण्यांना दिलासा मिळाला आहे.
उन्हाळा आला की पाणीप्रश्न पेटतो. मानवाला जसा पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो तसा तो वन्यजीवांच्या वाट्यालाही असतोच. आकाशात सूर्य आग ओकत असताना जंगलात पाणवठे कोरडे पडले असतात. अशावेळी प्राण्यांना पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागते. दरवर्षी वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येतात आणि मानव- वन्यजीव संघर्ष निर्माण होतो. अनेक प्राणी पाण्याच्या शोधात विहिरी किंवा तलावात पडल्याच्या घटना समोर येतात. वनविभागाला टँकरद्वारे दरवर्षी जंगलातील पाणवठ्यात पाणी टाकावे लागते. काही स्वयंसेवी संस्थाही या कामात विभागाची मदत करतात. यावर्षी मात्र अशी भीषण पाणीटंचाई दिसून येत नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. वर्षभर झालेली वरुणराजाची हजेरी लाभदायक ठरली आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी सांगितले, वनविभागाला दरवर्षी जंगलात पाण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न करावे लागते. त्यानुसार कृ त्रिम पणावठ्यांची निर्मिती केली आहे. पेंच प्रकल्पात ११४ नैसर्गिक, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणारे १४५ कृ त्रिम आणि सौरऊर्जेवर चालणारे ६४ पाणवठे आहेत. बोर अभयारण्यात ३२ नैसर्गिक, ८२ कृ त्रिम व ४६ सौर पंप आहेत. दुसरीकडे टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यात २८ नैसर्गिक, १४ कृ त्रिम आणि ५० सौर पंप आहेत. या पाणवठ्यांवर पुरेसा पाणीसाठा असून सध्यातरी कमतरता नाही, असा दावा त्यांनी केला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातही पाणवठ्यावर मुबलक पाणीसाठा असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची सध्या गरज पडली नाही. गरज पडल्यास तसे करण्यात येईल, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जात असल्याचा विश्वास स्थानिक अधिकाऱ्यांनी दिला.

वणवे आणि नियंत्रणाकडे लक्ष
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये जंगलसफारीकडे लोकांचा कल वाढतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे वन्य पर्यटन बंद असल्याने पर्यटकांची व्यवस्था करण्याचा कर्मचाऱ्यांचा ताण कमी झाला आहे. मात्र उन्हाळ्यात जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे वणवे नियंत्रित करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांकडे कायम आहे. याशिवाय तस्करी रोखण्यासाठी गस्तही वाढविण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Adequate water storage in forest water bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.