मुंबई-हटिया दरम्यान अतिरिक्त स्पेशल ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:07 IST2021-04-13T04:07:18+5:302021-04-13T04:07:18+5:30

- नागपूर मार्गे धावणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे प्रशासनाने मुंबई-हटिया दरम्यान नागपूर मार्गे अतिरिक्त स्पेशल ट्रेल चालविण्याचा ...

Additional special train between Mumbai-Hatia | मुंबई-हटिया दरम्यान अतिरिक्त स्पेशल ट्रेन

मुंबई-हटिया दरम्यान अतिरिक्त स्पेशल ट्रेन

- नागपूर मार्गे धावणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रेल्वे प्रशासनाने मुंबई-हटिया दरम्यान नागपूर मार्गे अतिरिक्त स्पेशल ट्रेल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया द्विसाप्ताहिक स्पेशल ट्रेन (१३ ते ३० एप्रिलपर्यंत) प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी रात्री ११.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वाजता हटिया येथे पोहोचेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी नागपूरला सकाळी ११.५० वाजता पोहोचेल आणि पाच मिनिटाच्या थांब्यानंतर सकाळी ११.५५ वाजता पुढच्या मार्गाला निघेल. अशाच तऱ्हेने ०११२८ हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक स्पेशल ट्रेन (१५ एप्रिल ते २ मे पर्यंत) प्रत्येक गुरुवार व रविवारी हटिया येथून सकाळी ०८.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही ट्रेन प्रत्येक गुरुवारी व रविवारी रात्री ११.४० वाजता नागपूरला येऊन ११.४५ वाजता पुढच्या मार्गाला निघेल. ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगडा, राऊरकेला येथे थांबे घेईल. या ट्रेनमध्ये दोन वातानुकुलित थ्री टियर, पाच स्लिपर व १४ सेकण्ड सिटिंग कोच असतील.

...............

Web Title: Additional special train between Mumbai-Hatia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.