शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

११ वी आणि १२ वी च्या अभ्यासक्रमात नवीन व्यावसायिक विषयांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 21:30 IST

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनातर्फे मंजुरी मिळालेल्या नवीन व्यावसायिक विषयांचे, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून ११ वी साठी आणि शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून १२ वी साठी समावेश करण्यात आला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनातर्फे मंजुरी मिळालेल्या नवीन व्यावसायिक विषयांचे, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून ११ वी साठी आणि शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून १२ वी साठी समावेश करण्यात आला आहे. तसेच या विषयांची १२ वी ची प्रथम परीक्षा मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.हे व्यावसायिक अभ्यासक्रम नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन अंतर्गत फ्रेमवर्क पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ व्होकेशनल एज्युकेशन, भोपाळ यांचे मान्यताप्राप्त असल्याने शासनाने त्यास मान्यता दिलेली आहे. या योजनांतर्गत अ‍ॅग्रिकल्चरल-मायक्रो इरिगेशन टेक्नीशियन, बँकिंग फायन्शियल सर्व्हिसेस अ‍ॅण्ड इन्शुरन्स-बिझनेस करस्पॉडंट, मीडिया अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंट-अ‍ॅनिमेशन, आणि टुरिझम अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी-ट्रॅव्हल्स एजन्सी असिस्टंट हे व्यावसायिक विषय मंडळातर्फे अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आले आहेत.व्यावसायिक अभ्यासक्रम ११ वी आणि १२ वी च्या नियमित वैकल्पिक विषयांतील १ विषय वगळून त्याऐवजी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील १ विषय कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना घेता येईल. किंवा जे विद्यार्थी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील विषयासह ९ वी, १० वी व ११ वी उत्तीर्ण असतील अशाच विद्यार्थ्यांना १२ वी साठी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होता येईल.हा अभ्यासक्रम तसेच या विषयांचे प्रश्नपत्रिका आराखडे मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in  या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच ही माहिती उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांनी संबंधित शिक्षक व विद्यार्थांच्या निदर्शनास आणावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण