काटाेलमध्ये पाच काेराना रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST2021-02-12T04:10:12+5:302021-02-12T04:10:12+5:30

काटाेल : शहरात गुरुवारी (दि. ११) करण्यात आलेल्या टेस्टमध्ये काेराेनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ...

Addition of five Carana patients in Katail | काटाेलमध्ये पाच काेराना रुग्णांची भर

काटाेलमध्ये पाच काेराना रुग्णांची भर

काटाेल : शहरात गुरुवारी (दि. ११) करण्यात आलेल्या टेस्टमध्ये काेराेनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात हलवून त्यांच्यावर औषधाेपचार सुरू करण्यात आल्याची माहिती आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.

सध्या काटाेल तालुक्यातील काेविड केअर सेंटरमध्ये काेराेना संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात गुरुवारी पाच नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरात काेराेना साखळी पूर्ववत हाेते की काय, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. नव्याने आढळून आलेल्या काेराेना रुग्णांमध्ये काटाेल शहरातील आययुडीपी, जानकीनगर, घोडे प्लॉट, शनि चौक, पंचवटी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात आजवर १,७४० काेराेना संक्रमित रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यातील १,६७० रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. तालुक्यातील काेराेनामुळे २.९४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला असून, दुरुस्ती दर ९५.९० टक्के आहे, अशी माहिती काटाेल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुधीर वाघमारे यांनी दिली.

Web Title: Addition of five Carana patients in Katail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.