शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रकरणाला जि.प. प्रशासनच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 21:13 IST

५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त जि.प.प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार विभागीय चौकशी सुरू असणाऱ्या शिक्षकाला घोषित झाल्याने यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार निवड प्रक्रिया चांगलीच गाजली. परंतु या वादाकरिता जि.प. प्रशासनाची दप्तर दिरंगाई कारणीभूत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांचे पदाधिकारी करू लागले आहेत.

ठळक मुद्दे वर्षभरापासून शिक्षकांच्या विभागीय चौकशीवरील निर्णय प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त जि.प.प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार विभागीय चौकशी सुरू असणाऱ्या शिक्षकाला घोषित झाल्याने यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार निवड प्रक्रिया चांगलीच गाजली. परंतु या वादाकरिता जि.प. प्रशासनाची दप्तर दिरंगाई कारणीभूत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांचे पदाधिकारी करू लागले आहेत.यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार हा विभागीय चौकशी सुरू असणाऱ्या एका शिक्षकाला घोाषत झाल्याने चांगलाच वाद उफाळून आला. सबंधित शिक्षकाचा पुरस्कार रद्द करण्यात आला. त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीवर चांगलीच टीका झाली, परंतु याबाबत खऱ्या अर्थाने जि.प. प्रशासनाची दप्तरदिरंगाई कारणीभूत असल्याची दुसरी बाजू पुढे आली आहे. तसा आरोपच आता शिक्षक संघटनेचे पदाधिकारी करू लागले आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या या शिक्षकासोबतच जवळपास चाळीस शिक्षकांची एका प्रकरणात गेल्या तीन-चार वर्षापासून विभागीय चौकशी सुरू आहे. हे सर्व शिक्षक, शिक्षक सहकारी पतसंस्थेचे आजी-माजी संचालक असून एकाच वेळी शाळेत उपस्थिती व पतसंस्थेत दौरा दर्शविण्यात आल्याचा आरोप या शिक्षकांवर लावण्यात आला होता. यातील तीसपेक्षा अधिक शिक्षकांची विभागीय चौकशी विभागीय सहआयुक्त (चौकशी) यांच्याकडून पूर्ण झाली असून त्याबाबत त्यांच्याकडून प्रत्येक शिक्षकाचा स्वतंत्रपणे चौकशी अहवाल जि. प. प्रशासनाला जवळपास वर्षभरापूर्वी पाठविण्यात आला आहे. या अहवालाच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घेऊन विभागीय चौकशी पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आहे. साधारणत: तीन महिन्यांच्या आत त्याबाबत अंतिम निर्णय घेणे अपेक्षित असते. परंतु याबाबत जि.प. प्रशासनाकडून सातत्याने दप्तर दिरंगाई होत असून चौकशी अधिकाऱ्यांकडून आलेल्या अहवालावर जि.प. प्रशासनाकडून वेळीच निर्णय घेतला गेला नाही.संघटना पदाधिकाऱ्यांना अडकवून ठेवण्याचा प्रयत्नजि.प.च्या शिक्षण विभागात शिक्षकांचे अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून ते मार्गी लागावे याबाबत शिक्षक संघटना पदाधिकारी आग्रही असतात. या विभागीय चौकशी प्रकरणात बहुतांश संघटना पदाधिकारी आहेत. त्यावर लवकर निर्णय न घेता पदाधिकाऱ्यांना चौकशीत अडकवून ठेवण्याचा शिक्षण विभागाकडून जाणीवपुर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरTeacherशिक्षक