शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते विलास उजवणे यांच्यावर नागपुरात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 22:08 IST

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांना ‘ब्रेन स्ट्रोक’मुळे (अर्धंगवायू) ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील उपचारानंतर १० जानेवारीला नागपुरातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर पंचकर्म उपचार सुरू असून, प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे येथील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देप्रकृतीत सुधारणा : शासकीय आयुर्वेद रुग्णालयातून घेत आहेत पंचकर्म

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांना ‘ब्रेन स्ट्रोक’मुळे (अर्धंगवायू) ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील उपचारानंतर १० जानेवारीला नागपुरातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर पंचकर्म उपचार सुरू असून, प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे येथील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. विलास उजवणे यांना ९ मे २०१७ रोजी ‘ब्रेन स्ट्रोक’चा ‘अटॅक’ आला. त्यांना ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. काही दिवस येथील उपचारानंतर ते चालायला-फिरायला लागले. परंतु, त्यांना पंचकर्म घ्यायचे होते, यामुळे त्यांनी नागपुरातील सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याची सूचना कुटुंबीयांना केली. १० जानेवारीला डॉ. उजवणे यांना नागपुरात आणले. ते रुग्णालयात भरती नसले तरी रोज त्यांच्यावर पंचकर्म सुरू आहेत. या उपचारामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. लुईस जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उजवणे यांच्यावर उपचार सुरू असून, डॉ. बोंबार्डे व डॉ. बाबर हे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. आणखी १५ ते २० दिवस डॉ. उजवणेंवर पंचकर्म उपचार चालणार असल्याचे डॉ. लुईस जॉन यांनी सांगितले. डॉ. उजवणे सध्या नागपुरातील त्यांच्या नातेवाईकाकडे थांबले आहेत. डॉ. उजवणे हे १९८३ च्या बॅचचे नागपूरच्याच आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर