५४ टक्क्याने वाढले कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:26 IST2020-12-11T04:26:56+5:302020-12-11T04:26:56+5:30

नागपूर : कोरोना चाचण्यांसोबतच बाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून स्थिर आहे. मात्र, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५४ टक्क्याने वाढली आहे. ...

Active corona patients increased by 54% | ५४ टक्क्याने वाढले कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

५४ टक्क्याने वाढले कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

नागपूर : कोरोना चाचण्यांसोबतच बाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून स्थिर आहे. मात्र, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५४ टक्क्याने वाढली आहे. सध्या ५८६९ रुग्ण उपचाराखाली आहेत. गुरुवारी ४०९ नव्या बाधितांची भर पडली, तर ११ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या ११६१३७ झाली असून मृतांची संख्या ३७७४ वर पोहचली. आज ४०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

नागपूर जिल्ह्यात १२ नोव्हेंबर रोजी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३२०८ होती. परंतु डिसेंबर महिन्यात ती वाढायला लागली. १ डिसेंबरला ५०३३, २ डिसेंबरला ५२११, ३ डिसेंबरला ५४२५, ४ डिसेंबरला ५५७८, ५ डिसेंबरला ५७५६, ६ डिसेंबरला ५६३७, ७ डिसेंबरला ५६६६, ८ डिसेंबरला ५७०९ तर ९ डिसेंबरला ५८७९ रुग्ण होते. या रुग्णांमध्ये विविध शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये १५३९ तर होम आयसोलेशनमध्ये ४३३० रुग्ण आहेत. रुग्णांच्या या संख्येने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. आज ५३२२ चाचण्या झाल्या. यात ४३०० आरटीपीसीआर तर १०२२ रॅपिड अँटिजेन चाचण्या होत्या. अँटिजेन चाचणीतून १४० तर आरटीपीसीआरमधून २६९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १०६४९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यांचे प्रमाण ९१.७० टक्क्यांवर गेले आहे.

-खासगीमध्ये सर्वाधिक चाचण्या

महानगरपालिकेने व आरोग्य विभागाने ठिकठिकाणी कोरोना चाचणीचे नि:शुल्क केंद्र उघडले आहेत. परंतु त्यानंतरही बहुसंख्य संशयित रुग्ण खासगीमध्ये जात असल्याचे चित्र आहे. गुरुवारी शासकीय प्रयोगशाळा असलेल्या एम्समध्ये १५९, मेडिकलमध्ये ५७२, मेयोमध्ये ७७०, माफसूमध्ये ११०, नीरीमध्ये २२०, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमध्ये २२७ संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या, तर खासगी लॅबमध्ये २२९२ चाचण्या झाल्या.

::कोरोनाची आजची स्थिती

-दैनिक संशयित : ५३२२

-बाधित रुग्ण : ११६१३७

_-बरे झालेले : १०६४९४

- उपचार घेत असलेले रुग्ण : ५८६९

- मृत्यू : ३७७४

Web Title: Active corona patients increased by 54%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.