ॲक्टिव्हा चोराचा धंतोली पोलिसांनी लावला छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST2021-09-14T04:12:24+5:302021-09-14T04:12:24+5:30

भीमराव रामजी चौहान (३९) रा. प्लॉट नं. ३८, हिवरे ले आऊट, जलाराम मंगल कार्यालयामागे हे डायग्रामिक पॅथॉलॉजी अभ्यंकर रोड ...

Activa thief nabbed by police | ॲक्टिव्हा चोराचा धंतोली पोलिसांनी लावला छडा

ॲक्टिव्हा चोराचा धंतोली पोलिसांनी लावला छडा

भीमराव रामजी चौहान (३९) रा. प्लॉट नं. ३८, हिवरे ले आऊट, जलाराम मंगल कार्यालयामागे हे डायग्रामिक पॅथॉलॉजी अभ्यंकर रोड धंतोली येथे ॲक्टिव्हा क्रमांक एम. एच. ४९, ए. ए- १७११ ने आले होते. त्यांनी गाडीची चावी न काढता गाडी पार्क करून सॅम्पल आणायला आत गेले. तेवढ्यात त्यांना गाडी सुरू झाल्याचा आवाज आला. त्यांना एक इसम गाडी घेऊन पळून जाताना दिसला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन आरोपी संदीप खेमचंद टेंभरे (२२) रा. बरघाट, जि. सिवनी, मध्य प्रदेश यास अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेली ॲक्टिव्हा जप्त करून भीमराव चौहान यांना परत केली. ही कारवाई पोलीस उपायुक्त विनिता साहू, सहायक पोलीस आयुक्त तृप्ती जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णा सोनुले, दीपक चोरपगार, मारोती केंद्रे, संदीप पडवाल, मनोज सोनवणे, संजय तिवारी यांनी पार पाडली.

...............

Web Title: Activa thief nabbed by police