शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आता नियम तोडल्यास ट्रॅव्हल्सवर कारवाई; आरटीओ व वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहिम

By सुमेध वाघमार | Updated: November 9, 2023 15:52 IST

ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नागपूर : शहरातील ट्रॅव्हल्स कंपन्या नियम तोडून वाहतूक करीत असल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. या विषयावर बुधवारी नागपुरातील आरटीओ कार्यालयात बैठक झाली असता ट्रॅव्हल्सने स्वत:च्या कामात तातडीने सुधारणा न केल्यास आरटीओ व वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहिम राबविण्यात येईल व कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

बैठकीला पोलीस उपआयुक्त (वाहतूक) चेतना तिडके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीण राजेश सरक, अशफाक अहमद, सहायक प्रादेशिक परविहन अधिकारी हर्षल डाके, स्नेहा मेंढेसह शहर व ग्रामीण भागातील आरटीओ आणि वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी, ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मालक उपस्थित होते.

प्रथम वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नियमबाह्यरीत्या शहरात कुठे-कुठे मालवाहतुकीसाठी बसमध्ये नियमबाह्य माल भरले जातात, शहरातील विविध रस्त्यांचे काम सुरू असलेल्यासह इतर लहान रस्त्यांवर बस चालवल्याने कुठे वाहतूक कोंडी होते, प्रवाशांना रस्त्यावर कुठेही थांबून घेतले जात असल्याने निर्माण होणारी वाहतूक समस्या, गणेश टेकडी येथील बसस्थानक स्थलांतरित करण्यासह इतरही अनेक पुरावे छायाचित्रासह बैठकीत दाखविण्यात आले. यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले. तातडीने याचे पालन न झाल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला.  यावेळी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नियम पाळण्याचे व प्रवाशांना त्रास होणार नाही याचे आश्वासन दिले. 

या मार्गावर असणार पोलीस, आरटीओची नजर

शहरातील जाधव चौक, लोहापूल चौक, शीतला माता मंदिर चौक, बोले पेट्रोल पंप चौक, रविनगर चौक, रहाटे कॉलनी चौक, गीतांजली टॉकिज चौक, गणेश टेकडी येथील बसस्थानक परसरात ट्रॅव्हल्समुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. आता या मार्गावर पोलीस आणि आरटीओची नजर असणार असून नियम तोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूरTrafficवाहतूक कोंडी