शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर अनधिकृत खाद्यपदार्थ विकाल तर होईल कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:55 IST

दोन दिवसांत २३ जणांना अटक : नागपूर विभागात विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात ठिकठिकाणी छापे मारून तपास पथकाने अनधिकृत खाद्यपदार्थ तसेच पिण्याच्या बॉटल विकणाऱ्यांवर कारवाई केली. दोन दिवसांत २३ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून खाण्यापिण्याच्या चिजवस्तू जप्त करण्यात आल्या. 

आरोग्यास अपायकारक असलेल्या खाण्यापिण्याच्या चिजवस्तू रेल्वे स्थानक अथवा रेल्वे गाड्यांमध्ये विकल्या जाऊ नये यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यासंबंधाने कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेले आहेत. असे असूनही कारवाईसाठी चालढकल होत असल्याचे पाहून अनधिकृत खाद्यपदार्थ तसेच पेय विकणारी मंडळी ठिकठिकाणची रेल्वेस्थानक आणि गाड्यांमध्ये आरडाओरड करतात. त्यामुळे अशांवर कारवाई करण्यासाठी मित्तल यांनी सात वेगवेगळी पथके तयार करून त्यांना विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, या पथकांनी नागपूर रेल्वेस्थानक, बल्लारशाह रेल्वे स्थानक तसेच नागपूर-वर्धा, नागपूर-इटारसी विभाग तसेच नागपूर-सेवाग्राम-बल्लारशा मार्गावर ठिकठिकाणी शुक्रवारपासून छापे मारले. यात नागपूर स्थानकावर १२ विक्रेते अवैधपणे खाण्यापिण्याच्या वस्तू विकताना आढळले. त्यांना अटक करण्यात आली. नागपूर-वर्धा आणि नागपूर-इटारसी मार्गावर ५ तर, बल्लारशाह स्थानकावर २ अनधिकृत विक्रेत्यांना पकडण्यात आले. नागपूर- सेवाग्राम-बल्लारशाह मार्गावर ४ जणांकडून प्रतिबंध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्सचे १० बॉक्स जप्त केले. प्रवाशांनी अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून कोणत्याही चिजवस्तू विकत घेऊ नये आणि त्यांची माहिती लगेच रेल्वेच्या पोलिस किंवा गार्डला द्यावी, असे आवाहन या संबंधाने करण्यात आले आहे. 

तेलंगणा एक्स्प्रेसमध्ये अंबूज कॅटरर्सच्या क्लस्टर किचनमध्ये कारवाई कारवाईच्या या विशेष मोहिमेतील पथकाने ट्रेन नंबर १२७२४ तेलंगणा एक्स्प्रेसमध्येही कारवाई केली. पॅन्ट्री कारची तपासणी करून अंबूज कॅटरर्सच्या क्लस्टर किचनमध्ये अनधिकृतपणे ठेवण्यात आलेली ७ अवजड उपकरणे जप्त करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर