संचारबंदी भंग करणाऱ्यांवर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST2020-12-26T04:08:48+5:302020-12-26T04:08:48+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : राज्य शासनाने रात्रीच्या वेळी संचारबंदी जाहीर केली आहे. या संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर कठाेर कारवाई ...

Action will be taken against those violating the curfew | संचारबंदी भंग करणाऱ्यांवर कारवाई करणार

संचारबंदी भंग करणाऱ्यांवर कारवाई करणार

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : राज्य शासनाने रात्रीच्या वेळी संचारबंदी जाहीर केली आहे. या संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर कठाेर कारवाई केली जाईल. त्यामुळे हाॅटेल्स, धाबे व रिसाेर्ट मालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन ठाणेदार विश्वास फुलरवार यांनी काेंढाळी ठाण्यात आयाेजित शांतता समितीच्या सभेत केले.

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग तसेच काेंढाळी-वर्धा मार्गालगत काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत हाॅटेल्स, धाबे व रिसाेर्ट संख्या माेठी आहे. नाताळच्या सुट्या व नवीन वर्षानिमित्त आयाेजित केल्या जाणाऱ्या पार्टीमध्ये नागरिकांची गर्दी काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडणारी ठरू शकते. त्यामुळे ही सर्व प्रतिष्ठाने सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचेही तसेच प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव येथे नाकाबंदी करून वाहनांसह चालक व त्यातील व्यक्तींची कसून तपासणी केली जाईल. नागरिकांनी लग्नप्रसंग व इतर सामाजिक समारंभही याच वेळेत किंवा रात्रा ११ वाजेपर्यंत पार पाडावे. यात कसून करणाऱ्यांविरुद्ध कठाेर कारवाई केली जाणार असल्याचे विश्वास फुलरवार यांनी स्पष्ट केले. सहायक पाेलीस निरीक्षक सुभाष साळवे यांनी प्रास्ताविकातून सभेच्या आयाेजनाचा उद्देश स्पष्ट केला. हाॅटेल्स, रिसाेर्ट व धाबे मालकांना पाेलिसांच्या वतीने संचारबंदीच्या नाेटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सभेला हाॅटेल्स, रिसाेर्ट व धाबे मालकांसह पाेलीस पाटील व सरपंच उपस्थित हाेते. यावेळी काेराेना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गाैरव करण्यात आला.

Web Title: Action will be taken against those violating the curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.