शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागपुरातील अवैध आॅटोरिक्षाचालकांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:20 IST

खासगी आॅटोरिक्षाचालकांना नाममात्र शुल्क भरून परवाना नोंदविण्याची संधी देण्यात आली होती, परंतु बहुसंख्य आॅटोचालकांनी नोंदणीच केली नाही. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरच्यावतीने विना परवानाधारक आॅटोचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे प्रादेशिक परिवहन कार्यालयाची मोहीम : ३१ मार्चपर्यंत दिली होती मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी आॅटोरिक्षाचालकांना नाममात्र शुल्क भरून परवाना नोंदविण्याची संधी देण्यात आली होती, परंतु बहुसंख्य आॅटोचालकांनी नोंदणीच केली नाही. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरच्यावतीने विना परवानाधारक आॅटोचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.शहरातील खासगी रिक्षा परवाना नोंदविण्यासाठी दोन्ही कार्यालयाने ३१ मार्चपर्यंत कालावधी दिला होता. या दरम्यान काही खासगी आॅटोरिक्षाचालकांनी शुल्क जमा करून नोंदणी केली. परंतु अद्यापही बहुतांश खासगी आॅटोचालक अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करताना दिसून येत आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे शहरात १५ मेपर्यंत अशा आॅटोचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आॅटोरिक्षा संघटनांनी विनापरवाना खासगी आॅटोचालकाची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयास देण्याचे तसेच जनतेने खासगी संवर्गातील आॅटोरिक्षामध्ये प्रवास न करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले आहे.शहरात सात हजार खासगी आॅटोरिक्षासूत्रानुसार, शहरात सात हजार खासगी आॅटोरिक्षा असून यातील साधारण १० टक्के आॅटोरिक्षांनी परवाने घेतले आहे, तर ९० टक्के चालकांकडे परवाना नसताना अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करीत आहेत. परवानाधारक आॅटोरिक्षांची संख्या १५ हजार आहेत. यातील ३ हजार २०० आॅटोरिक्षा भंगारात काढूनही रस्त्यावर धावत आहेत.

टॅग्स :Automobileवाहनnagpurनागपूर