मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:08 IST2021-04-10T04:08:17+5:302021-04-10T04:08:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ४७ नागरिकांविरुध्द कारवाई केली ...

Action on walkers without masks | मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ४७ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे २३,५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३७,३१९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत १,७०,१८,५०० चा दंड वसूल केला आहे. मनपा उपद्रव शोध पथक व रेल्वे पोलीस यांनी संयुक्तपणे रेल्वे स्थानकावर मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई सुरु केली. दररोज ही कारवाई केली जात आहे.

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली असून कोरोना विषाणूचा संसर्गाचा अद्यापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाद्वारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.

शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १४, धरमपेठ झोन अंतर्गत ४, हनुमाननगर झोन अंतर्गत ०, धंतोली झोन अंतर्गत ०, नेहरुनगर झोन अंतर्गत ८, गांधीबाग झोन अंतर्गत १, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ४, लकडगंज झोन अंतर्गत ५, आशीनगर झोन अंतर्गत ६, मंगळवारी झोन अंतर्गत ५ जणांविरुध्द ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Action on walkers without masks