शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई : डी. मल्लिकार्जुन रेड्डी

By कमलेश वानखेडे | Updated: October 18, 2024 17:47 IST

Nagpur : डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांचा थेट फडणवीस- बावनकुळेंवर आरोप

कमलेश वानखेडे- नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या निवडणुकीत रामटेकमधून आपण भाजपा अधिकृत उमेदवार असताना आ. आशीष जयस्वाल हे बंडखोरी करीत अपक्ष लढले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला माझ्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे जयस्वाल यांच्या विरोधात आपरण उठवला असता मला पक्षातून निलंबित करण्यात आले. मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समर्थक असल्यामुळेच माझ्यावर कारवाई करण्यात आली, असा थेट आरोप पक्षातून निलंबित करण्यात आलेले भाजपचे माजी आमदार डी. मल्लिकाजून रेड्डी यांनी केला.

डी. मल्लिकार्जून रेड्डी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्ला चढविला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कुणालाही न कळवता परस्पर आशीष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली. जयस्वाल यांच्या बंडखोरीमुळे माझा पराव झाला होता. त्यामुळे त्यांची उमेदवारी मी कशी सहन करणार. जयस्वाल यांच्या उमेदवारीविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेउन सुमारे ५०० जणांनी राजीनामा दिला. माझे म्हणणे समजून न घेता, मला कुठलिही कारणे दाखवा नोटीस न देता फडणविस- बावनकुळे यांच्याकडून ताबडतोब करवाई करण्यात आली. मी नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात अनेक वर्षापासून पक्षाचे काम करीत आहे. गडकरी साहेबांच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर कारवाई केली जात आहे. आज माझ्यावर करवाई झाली, उद्या दुसऱ्यावर होईल. मी याबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांना पत्र पाठविले आहे. मी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला नको, असे बोललो म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली माझ्यावर करवाई झाली. हा सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय आहे, असेही ते म्हणाले.

मी पराभूत झाल्यावर देखिल भाजपचे काम करीत आहे. तीन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीचे सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे मला उमेदवारी द्यायची नसेल तर भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी आपली मागणी आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये आमची लढत थेट जयस्वाल यांच्या सोबत असते. त्यामुळे त्यांची उमेदवारी आम्ही का मान्य करावी, असा सवालही रेड्डी यांनी केला.

गडकरी- फडणवीसांमध्ये मतभेदभाजप नेते नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत. मात्र ते मला उघडपणे बोलता येणार नाही. हा विषय फार मोठा आहे. माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार अनिल सोले हे आता सक्रिय राजकारणात दिसत नाहीत. तेसुद्धा गडकरी यांचे समर्थक आहेत, असे सांगत रेड्डी यांनी पक्षांतर्गत मोठी धुसफूस सुरू असल्याचा दावा केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेMallikarjun Reddyमल्लिकार्जुन रेड्डीnagpurनागपूर