‘मेट्रो’ला बदनाम करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:57+5:302021-02-05T04:44:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘मेट्रो’मधील हुल्लडबाजीवरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपराजधानीला विकासाची ओळख देणाऱ्या ‘मेट्रो’मध्ये ...

‘मेट्रो’ला बदनाम करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मेट्रो’मधील हुल्लडबाजीवरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपराजधानीला विकासाची ओळख देणाऱ्या ‘मेट्रो’मध्ये जुगारासह हिडीस कृत्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी पक्षाचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
‘मेट्रो’सोबतच शहराची संस्कृती बदनाम करणारे ‘व्हिडिओ’ समाजमाध्यमांमध्ये ‘व्हायरल’ झाले. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार, नगरसेवक दुनेश्वर पेठे, राजेश माटे, आदींच्या उपस्थितीत असामाजिक कृत्य झाले. ‘मेट्रो’ने या घटनेची पोलीस तक्रारदेखील केली. मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. सरकारविरोधात काही म्हटले तर लहान घटनांतदेखील कारवाई करणारे नागपूर पोलीस अधिकारी या प्रकरणात मूग गिळून गप्प बसले आहे, असा आरोप यावेळी लावण्यात आला. शिष्टमंडळात शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, महापौर दयाशंकर तिवारी, पिंटू झलके, मनीषा धावडे, माजी आमदार मिलिंद माने, संजय बंगाले, राम आंबुलकर, नरेंद्र बोरकर, सुनील मित्रा, संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.