शहरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:30+5:302021-01-19T04:10:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील सर्व झोन अंतर्गत असलेले रस्ते आणि फुटपाथ अतिक्रमण ...

शहरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई जोरात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील सर्व झोन अंतर्गत असलेले रस्ते आणि फुटपाथ अतिक्रमण मूक्त करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात एकाच वेळी सर्व भागात कडक अभियान राबविण्यात यावे, असे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. आयुक्तांच्या या आदेशानंतर शहरात अतिक्रमण विरोधी कारवाईला जोर आला आहे. या अंतर्गत सोमवारी शहरातील सर्व झोनमध्ये कारवाई करण्यात आली. प्रत्येक भागात अतिक्रमण हटविण्यासाठी पथक बुलडोजरसह सक्रिय होते.
शहरात अतिक्रमण ही एक मोठी समस्या बनली आहे. अनेकदा कारवाई केल्यानंतरही अतिक्रमण जैसे थे होते. संबंधित भागात नियमित कारवाई होत नाही, त्यामुळे अतिक्रमण कारवाईचा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रशासनाने तयारी दाखवत, एकाच वेळी सर्व झोनमध्ये कारवाई सुरू केली आहे. सोबतच यापुढे नियमित कारवाई करण्याचा विश्वासही व्यक्त केला जात आहे. अतिक्रमण विराेधत पथकाने सोमवारी कारवाई करीत गांधीबाग झोनअंतर्गत मोमीनपुरा कब्रस्तान रोड आणि धंतोली झोनमधील सुभाष रोडवरील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविले. कब्रस्तान रोडवरील ८ दुकाने तोडली व २५ शेड काढण्यात आले. यानंतर, मंगळवारी झोनमध्ये सीआयडी कार्यालयाजवळील परिसर अतिक्रमणापासून मूक्त करण्यात आले. हनुमाननगर झोनमधील प्रभाग ३३ मध्ये पार्किंगच्या जागेवर अवैधपणे केलेले बांधकाम तोडण्यात आले. नेहरूनगर झोनमध्येही अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त महेश मोरेणे यांच्या मार्गदर्शनात सर्व झोनमधील अधिकाऱ्यांनी आपापल्या भागात अतिक्रमण विरोधी कारवाई केली.