शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविल्यास कारवाई  : पालकमंत्री राऊत यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 21:19 IST

जनतेला रास्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने संबंधित व्यापारी-दुकानदारांना तात्काळ सूचना द्याव्या तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश आज शनिवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त कडक करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संचारबंदी, लॉकडाऊनच्या काळात नागपुरात जीवनावश्यक वस्तू व सेवा सुरळीतपणे सुरू आहेत. मात्र, या कठीण काळात कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे जसे किराणा, धान्य, भाजीपाला यांची भाववाढ होऊ नये, जनतेला रास्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने संबंधित व्यापारी-दुकानदारांना तात्काळ सूचना द्याव्या तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश आज शनिवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.पालकमंत्र्यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना नागपूर जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत माहिती दिली. यापूर्वी त्यांनी जिल्हा प्रशासन जसे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, मेयो व मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडून सद्यस्थितीचा आढावा घेतला. हातावर आणून पानावर खाणाऱ्या गोरगरीब, निराधार, झोपडपट्टीतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धस्तरीय काम सुरू आहे. नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता अकरापर्यंत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर येणारे दहा दिवस अतिशय महत्त्वाचे, कठीण आणि निर्णायक राहणार आहेत. त्यामुळे जनतेने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घरीच राहावे, शांतता बाळगावी, संयम ठेवावा, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टनस) पालन करावे, असे पालकमंत्र्यांनी कळकळीचे आवाहन केले आहे.नागपुरातील बहुतांश जनता, प्रशासनाच्या सूचनांचे नियमित पालन आणि सहकार्य करीत आहे. ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र, काही लोक अद्यापही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून ‘मला काही होत नाही’ या आविर्भावात विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस विभागाने अधिक कडक बंदोबस्त करावा अशा सूचनाही शनिवारी पालकमंत्री राऊत यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक (नागपूर ग्रामीण) यांना दिल्या आहेत. नागपूरच्या जनतेने अशा या कठीण परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, घरीच राहावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतvegetableभाज्या