शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नियमांचे पालन न करणाऱ्या पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:27 IST

पीओपीच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण होऊ नये यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी)मूर्ती विक्री व वापरासंदर्भात शासनाचे नियम आहेत. नियमांची यंदा कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. महापालिकेने जारी केलेल्या निवेदनानुसार मूर्तीच्या मागे लाल खूण आणि मूर्ती विक्रेत्यांनी फलक विक्री ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. नियमाचे पालन न करणाऱ्या पीओपी मूती विक्रे त्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी दिला आहे.

ठळक मुद्देअतिरिक्त आयुक्तांचा इशारा : स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत नियमांचे पालन करण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पीओपीच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण होऊ नये यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी)मूर्ती विक्री व वापरासंदर्भात शासनाचे नियम आहेत. नियमांची यंदा कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. महापालिकेने जारी केलेल्या निवेदनानुसार मूर्तीच्या मागे लाल खूण आणि मूर्ती विक्रेत्यांनी फलक विक्री ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. नियमाचे पालन न करणाऱ्या पीओपी मूती विक्रे त्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी दिला आहे.गणेशोत्सव तयारीच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत महापालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात नुकत्याच आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.अझीझ शेख पुढे म्हणाले, नागपूर महानगरपालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने नेहमीच पुढाकार घेत असते. यात स्वयंसेवी संस्थांचा वाटा मोठा आहे. जनजागृती करण्याचे कार्य स्वयंसेवी संस्था दरवर्षी करतात. निर्माल्य संकलन, जलप्रदूषण होऊ नये म्हणून पीओपीच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे. यासाठी स्वयंसेवी संस्था करीत असलेले प्रयत्न आणि मदत मोलाची आहे. पीओपी मूर्तीसंदर्भात कारवाईसाठी यंदा उपद्रव शोधपथक तैनात असेल. प्रत्येक विक्रेत्यांकडे जाऊन नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही याबाबत ते खातरजमा करतील. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर दंडात्मक कारवाई करतील, असेही शेख म्हणाले.प्रदीप दासरवार यांनी यंदा शहरात ठेवण्यात येणाºया कृत्रिम तलाव आणि विसर्जनासंदर्भात माहिती दिली. शुक्रवारी तलाव, सक्करदरा तलाव आणि सोनेगाव तलाव याही वर्षी विसर्जनासाठी बंद असून या तलाव परिसरात कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहे.ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी यांनी पीओपी मूर्तीच्या मुद्यावर मत मांडले. फुटाळा येथे ग्रीन व्हिजीलचे संपूर्ण स्वयंसेवक दहाही दिवस सेवा देतात. मात्र, पीओपी मूर्तींवर नियमाप्रमाणे खूण नसल्याकारणाने अडचणीचे होते. त्यामुळे पीओपीसंदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विसर्जनादरम्यान तलावांवर अनेक असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा असामाजिक तत्त्वांवर अंकु श लावण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.सुरभी जैस्वाल यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भातील जनजागृती स्मार्ट सिटी स्क्रीन आणि सोशल मीडियावरून करण्याची सूचना केली.बैठकीला ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, रोटरी क्लब आॅफ नागपूरच्या डॉ. दीपा जैस्वाल, अंजली मिनोहा, अरण्य पर्यावरण संस्थेचे प्रणय तिजारे, अभिजित लोखंडे, रोटरी क्लब आॅफ नागपूर व्हिजनचे दिनेश नायडू, रोटरी क्लब आॅफ नागपूर मिहान टाऊनचे हरीश अडतिया, मंजूषा चकनलवार, किंग कोब्रा युथ फोर्सचे अरविंदकुमार रतुडी, संजय पंचभाई, निसर्ग विज्ञान मंडळचे डॉ. विजय घुगे, दीपक शाहू, डी.ई. रंगारी, वृक्ष संवर्धन समितीचे बाबा देशपांडे, जनजागृती आव्हान बहुउद्देशीय समितीचे प्रदीप हजारे, मिलिंद टेंभुर्णीकर, निखिलेश शेंडे, पीओपी मूर्तीविरोधी कृती समितीचे नितीन माहुलकर, चंदन प्रजापती, हरित शिल्पी बहुउद्देशीय संस्थेचे सुरेश पाठक आदी उपस्थित होते.मातीच्या मूर्तीचे स्वतंत्र मार्के ट करापीओपी मूर्तीवर अंकुश आणण्यासाठी महापालिकेने मातीच्या मूर्ती विक्रीसाठी झोननिहाय स्वतंत्र मार्के ट तयार करण्याची सूचना रोटरी क्लबच्या प्रतिनिधींनी केली. फुटाळा आणि अन्य काही ठिकाणी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याची सूचना केली. कृत्रिम टँक हे पहिल्या दिवसापासूनच ठेवावे, अशी सूचना प्रतिनिधींनी केली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGaneshotsavगणेशोत्सव