लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धरमपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबवून, पार्किंगचे नियोजन करून नो-पार्किंग झोन के ले. हे करताना रस्त्यावरील फेरीवाले, दुकानदार यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आले. परंतु आजही परिसरातील काही श्रीमंत लोकांनी प्रशासनाला न जुमानता रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. लोक मतच्या पाहणीत हे अतिक्रमण आले असून, प्रशासनाकडून या व्यक्तीवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.खंडेलवाल ज्वेलर्सच्या अगदी जवळ एक बंगला आहे. या बंगल्याच्या मालकाने आपल्या वाहनाचे पार्किंग रस्त्यावर बांधले आहे. या बंगल्याच्या कम्पाऊंड वॉलला लागून फुटपाथ आहे आणि फुटपाथनंतर या व्यक्तीने वाहनांसाठी पार्किंग बांधले आहे. एकीकडे प्रशासन वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर दोनवेळेचे पोट भरणाºयांवर कारवाई करीत आहे. वाहतूक विभाग लोकांना वाहनांच्या पार्किंगसंदर्भात जनजागृती करीत आहे. मनपाचा अतिक्रमण विभाग रस्त्यावर दिसलेले अतिक्रमण सरसकट तोडत आहे. मात्र या व्यक्तीने आपल्या बंगल्यापुढे रस्त्यावर अतिक्रमण करून वाहनांसाठी पार्किंग बांधले आहे. त्याकडे मनपा व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. धरमपेठेतील काही नागरिक नो-पार्किंग झोनसाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे. परंतु काही लोकांकडून या उपक्रमाला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अशांवर कारवाई न केल्यास, धरमपेठ नो-पार्किंग झोनचा प्रशासनाचा उपक्रम फोल ठरू शकतो.
गरिबांवर कारवाई, श्रीमंतांची पाठराखण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:25 IST
धरमपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबवून, पार्किंगचे नियोजन करून नो-पार्किंग झोन के ले.
गरिबांवर कारवाई, श्रीमंतांची पाठराखण
ठळक मुद्देधरमपेठ नो-पार्किंग झोनचे वास्तव