रेल्वेस्थानकावर मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:08 IST2021-03-25T04:08:03+5:302021-03-25T04:08:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेचे उपद्रव शोध पथक व रेल्वे पोलीस यांनी बुधवारी संयुक्तपणे रेल्वेस्थानकावर मास्कशिवाय ...

Action against pedestrians without masks at railway stations | रेल्वेस्थानकावर मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

रेल्वेस्थानकावर मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेचे उपद्रव शोध पथक व रेल्वे पोलीस यांनी बुधवारी संयुक्तपणे रेल्वेस्थानकावर मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई केली. ही कारवाई दररोज सुरू राहणार आहे.

उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ६६ नागरिकांविरुध्द कारवाई करून ३३ हजाराचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३६,५१२ नागरिकांविरुध्द कारवाई करून १ कोटी ६६ लाख १५ हजारांचा दंड वसूल केला आहे. शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १०, धरमपेठ २, हनुमाननगर ४, धंतोली ४, नेहरुनगर ९, गांधीबाग २, सतरंजीपुरा २, लकडगंज ५, आशीनगर १० व मंगळवारी झोन अंतर्गत १८ जणांकडून दंड वसूल केला. ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Web Title: Action against pedestrians without masks at railway stations