९ प्रतिष्ठानांवर कारवाई, ६३ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:08 IST2021-03-09T04:08:38+5:302021-03-09T04:08:38+5:30

नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६३ हजारांचा दंड वसूल केला. दरम्यान, उपद्रव ...

Action against 9 establishments, fine of Rs | ९ प्रतिष्ठानांवर कारवाई, ६३ हजारांचा दंड वसूल

९ प्रतिष्ठानांवर कारवाई, ६३ हजारांचा दंड वसूल

नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६३ हजारांचा दंड वसूल केला. दरम्यान, उपद्रव पथकाने शहरातील ९५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्रिमूर्तीनगर येथे घरी होणाऱ्या लग्नसमारंभात सामाजिक अंतर न पाळण्यासाठी ५ हजाराचा दंड वसूल केला.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांनी ही कारवाई केली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत ९ मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. १५ हजाराचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनअंतर्गत पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार रुपये दंड वसूल केला. हनुमाननगर झोन येथील सहा प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. १३ हजार दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनअंतर्गत ९ मंगल कार्यालये व लॉनची तपासणी करण्यात आली. नेहरूनगर झोनमधील ११ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार दंड वसूल केला.

गांधीबाग झोन क्षेत्रातील ९ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनमधील ८ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. लकडगंज झोनअंतर्गत १० प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार दंड वसूल केला. आशीनगर झोनमध्येही १२ प्रतिष्ठाने तपासली. १० हजार रुपये दंड केला. मंगळवारी झोनमधील १४ प्रतिष्ठानांची तपासणी केली.

Web Title: Action against 9 establishments, fine of Rs