५ प्रतिष्ठानांवर कारवाई ;४५ हजाराचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:31+5:302021-03-04T04:13:31+5:30
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी ५ दुकाने, प्रतिष्ठानांवर कारवाई करून ४५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. ...

५ प्रतिष्ठानांवर कारवाई ;४५ हजाराचा दंड
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी ५ दुकाने, प्रतिष्ठानांवर कारवाई करून ४५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. दरम्यान, उपद्रव पथकाने शहरातील ९१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांनी ही कारवाई केली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत तीन मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. धरमपेठ झोनअंतर्गत पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार रुपये दंड वसूल केला. धरमपेठ झोनअंतर्गत पाच हजार रुपये, हनुमाननगर झोन येथील तीन प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. परंतु, कुठलाही दंड वसूल करण्यात आला नाही. धंतोली झोनअंतर्गत ११ मंगल कार्यालये व लॉनची तपासणी करण्यात आली. नेहरूनगर झोनमधील १४ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली.
गांधीबाग झोन क्षेत्रातील पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार रुपये दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनमधील तीन प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. लकडगंज झोनअंतर्गत एकूण १२ प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजाराचा दंड वसूल केला. आशीनगर झोनमध्येही १६ प्रतिष्ठाने तपासली. एकाला पाच हजार रुपये दंड केला. मंगळवारी झोनमधील १९ प्रतिष्ठानांची तपासणी केली. एकाला २० हजार दंड केला.