मास्कशिवाय फिरणाऱ्या ३६,८०५ लोकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:07 IST2021-03-31T04:07:57+5:302021-03-31T04:07:57+5:30

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ८० नागरिकांकडून ४० हजार रुपयांचा दंड ...

Action against 36,805 people walking without masks | मास्कशिवाय फिरणाऱ्या ३६,८०५ लोकांवर कारवाई

मास्कशिवाय फिरणाऱ्या ३६,८०५ लोकांवर कारवाई

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ८० नागरिकांकडून ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३६,८०५ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ६७ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली असून, कोरोना विषाणूचा संसर्गाचा अद्याप धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नाही. नागरी भागात तर विनामास्क नागरिक फिरताना दिसतात. ही बाब घातक आहे.

पथकाद्वारे मंगळवारी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत २३, धरमपेठ व हनुमाननगर झोनअंतर्गत प्रत्येकी १, धंतोली ७, नेहरूनगर ६, गांधीबाग ७, सतरंजीपुरा ०, लकडगंज ४, आशीनगर १८, मंगळवारी झोनमध्ये १३ जणांविरुद्ध केली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली जात आहे.

Web Title: Action against 36,805 people walking without masks