३६ प्रतिष्ठानांवर कारवाई; २.५९ लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:13 IST2021-05-05T04:13:27+5:302021-05-05T04:13:27+5:30

लक्ष्मीनगर विभागांतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजारांचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ३० ...

Action against 36 establishments; 2.59 lakh fine | ३६ प्रतिष्ठानांवर कारवाई; २.५९ लाखाचा दंड

३६ प्रतिष्ठानांवर कारवाई; २.५९ लाखाचा दंड

लक्ष्मीनगर विभागांतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजारांचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ३० हजार, हनुमान नगर विभागाच्या पथकाने तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार, धंतोलीच्या पथकाने १० हजारांचा दंड वसूल केला. नेहरू नगर येथे सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून २५ हजार रुपये, गांधीबाग येथे आठ प्रतिष्ठानांची तपासणी करून ८३ हजार रुपये, सतरंजीपुरा येथे तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार रुपये, लकडगंज येथे ९ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये, आसीनगर पथकाने १४ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये तर मंगळवारी विभागामधील पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.

Web Title: Action against 36 establishments; 2.59 lakh fine