Action against 33 people in Nagpur district on one day under Prohibition act | नागपूर जिल्ह्यात दारूबंदीअंतर्गत एकाच दिवशी ३३ जणांविरुद्ध कारवाई
नागपूर जिल्ह्यात दारूबंदीअंतर्गत एकाच दिवशी ३३ जणांविरुद्ध कारवाई

ठळक मुद्देसाडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नागपूर शहर, उमरेड, काटोल, सावनेर, हिंगणा, पारशिवनी परिसरात विविध ठिकाणी दारूबंदी कायद्यांतर्गत एकाच दिवशी ३३ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेमध्ये साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रभारी अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर व मिलिंद पटवर्धन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत उपरोक्त ठिकाणी एकाच वेळी कारवाई करून ८ हजार २६३ लिटर सडवा नाश करण्यात आला. तसेच हातभट्टी दारू २०८४ लिटर, देशीदारू १०० लिटर तसेच चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०४ डीएन ७९८० होंडा वेर्ना कार व एक दुचाकी एमएच ३१ सीजे ३८७६ इत्यादी जप्त करण्यात आली.
याचबरोबर नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत मिळून आलेल्या तीन मद्यपींना न्यायालयाने प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड केला. या विशेष मोहिमेमध्ये भरारी पथकाचे निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे यांच्या पथकाने चारचाकी वाहनातून जाणारी १४४० लिटर मोहा दारू वाहनासह जप्त केली.

 


Web Title: Action against 33 people in Nagpur district on one day under Prohibition act
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.